Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार

यानिमित्त तिघा जिगरबाजांची 'ही' इच्छाही लवकरच होणार पूर्ण आहे.
Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार
Updated on

Pune Girl Student Attack: पुण्यातील तरुणीचा कोयता हल्ल्यातून जीव वाचवणारे तीन जिगरबाज तरुण लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी यांचा पुण्यात जाहीर सत्कार केला जाणार आहे.

राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात हा सत्कार पार पडेल. पण कधी आणि केव्हा याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. यानिमित्त या तिघांची एक इच्छाही पूर्ण होणार आहे. (Pune Girl Student Attack Youth will be felicitated by Sharad Pawar at Pune who rescue girl)

Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार
Modi Government : मोदी सरकारचा मोठा निर्णय! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त

तिघांनी व्यक्त केली होती 'ही' इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या जीवावर उदार होत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तीन तरुणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आपल्या या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी काल गुरुवारी या तरुणांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना त्यांचं पारितोषिक दिल. यावेळी लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी या तिघांनी शरद पवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच आपण या तरुणांची मागणी लवकरच पूर्ण करणार आहोत, असं आव्हाडांनी म्हटलं होतं.

शरद पवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता या तिघांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. पण केवळ भेटच होणार नाही तर त्यांचा पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवारांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कारही केला जाणार आहे. (Latest Marathi News)

...अशी तरुण मंडळी निर्माण झाली पाहिजेत - आव्हाड

या तिघांची भेट घेतल्यानंतर आव्हाडांनी पोस्ट करत म्हटलं होतं की, "या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्काही बसला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली. परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले.

मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे, हे विचारण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली. याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सूर असा दिसला की,"आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही. आमच्या समोर एका मुलीचा जीव जातोय आणि अश्या वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे, या विचारानं आम्ही तिचा जीव वाचवला...!" (Marathi Tajya Batmya)

Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार
''मला आलेल्या ऑफरकडे सीरियसली बघितलं नाही, परंतु बघणार नाही, असं नाही'' पंकजांच्या विधानाने खळबळ

विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत, अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल, यात शंका नाही.

पुण्यात नेमकं काय घडलं होतं?

पुण्यात आठवड्याभरपूर्वी सदाशिव पेठेतल्या मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या थरार घडला होता. यामध्ये एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ही तरुणी जीव वाचवण्यासाठी धावत असताना लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेस मडावी या तीन तरुणांनी हल्लेखाराला अडवून पकडून थेट पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेले होते. तरुणांच्या या प्रसंगावधानानं या तरुणीचा जीव वाचला होता. त्यामुळं सर्वच स्तरातून या तिघांचं अजूनही कौतुक केलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.