Pune : गिरवली अपघात चालकाच्या चुकीमुळे

पुढील तपास जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
accident
accident sakal
Updated on

घोडेगाव : गिरवली येथील आयुका केंद्रावर भेट देवून परत येत असताना झालेल्या अपघातात 49 जण जखनी झाले. परंतु अर्ध्या तासात मदत पोहचली यांचे सर्व श्रेय येथे जवळच गुरे चारणारा धनंजय केदारी याला जाते. केदारी यांनी गावातील गणेश हगवणे, अनिल सैद, यांना फोन करून घटनेची माहिती दिली. गावातील 15 ते 20 जण व घोडेगावहून 4 ते 5 जण पोहचल्याने जखमींना वेळेत उपचार मिळाले त्यामुळे जिवीत हानी झाली नाही.

धवल काळे, गणेश हगवणे, अनिल सैद, अजित सैद, विजय सैद, पोलीस, होमगार्ड गावातील 15 तरूण मुले यांनी अवघ्या 20 ते 25 मिनिटात मुले बाहेर काढली. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, तहसिलदार रमा जोशी यांना वेळेत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. पहिल्या 5 मुलांना अनिल सैद यांनी आपल्या गाडीत घेवून घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात पोहचविले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी स्वत उभे राहून मदतीसाठी फोन केले. भोसरी येथील साईनाथ हॉस्पीटल मध्ये सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यास वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे यांनी सांगितले. येथे 5 जणांवर उपचार सुरू आहेत. 20 जणांना रात्री उशिरा पर्यंत उपचार करून घरी सोडण्यात आले.

असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, सचिव विश्वास काळे यांनी सांगितले. हा अपघात चालक लिलाधर ज्ञानेश्वर लांडगे (वय 45 वर्ष) यांच्या निष्काळजीपणे बस चालविलेल्या प्रकरणी व अपघात केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले. पुढील तपास जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()