Gamma Pulses : जीएमआरटीमुळे गॅमा स्फोटांच्या शोधाला नवा ‘ट्वीस्ट’

ऑक्टोबर महिन्याच्या दूसऱ्या रविवारी (ता.९) एक तीव्र गॅमा स्पंदन आपल्या सूर्यमालेला छेदून गेले आणि कृत्रिम उपग्रहांची कार्यक्षमता बाधीत झाली.
Gamma Pulses
Gamma Pulsessakal
Updated on
Summary

ऑक्टोबर महिन्याच्या दूसऱ्या रविवारी (ता.९) एक तीव्र गॅमा स्पंदन आपल्या सूर्यमालेला छेदून गेले आणि कृत्रिम उपग्रहांची कार्यक्षमता बाधीत झाली.

पुणे - ऑक्टोबर महिन्याच्या दूसऱ्या रविवारी (ता.९) एक तीव्र गॅमा स्पंदन आपल्या सूर्यमालेला छेदून गेले आणि कृत्रिम उपग्रहांची कार्यक्षमता बाधीत झाली. त्यामुळे क्षणार्धातच जगभरातील खगोलशास्रज्ञांनी वेगवान आणि शक्तिशाली दुर्बिणी स्फोटाच्या दिशेने वळविल्या अन् शोधासाठी एकच चढाओढ सुरू झाली. सर्वात तेजस्वी गॅमा किरणाच्या या स्फोटाबद्दल खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) घेतलेल्या निरीक्षणाने या संशोधनात एक नवा ‘ट्वीस्ट’ निर्माण झाला आहे.

Gamma Pulses
MP Supriya Sule : राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्णी धोकादायक

‘जीआरबी २२१००९ए’ नावाचा हा नवीन स्रोत सुमारे ३०० सेकंद टिकला. जो गॅमा किरण स्फोटांच्या इतिहासात सर्वात तेजस्वी उत्सर्जन होते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते असे दीर्घ कालावधीचे जीआरबी म्हणजे नवजात कृष्णविवराचा आवाज आहे. जेंव्हा एखादा विशाल तारा स्वतःच्या वस्तुमानाने स्वतःतच कोसळतो तेव्हा त्याच्या गाभ्यामध्ये हे कृष्णविवर तयार होते. हे नवजात कृष्णविवर जवळपास प्रकाशाच्या वेगाने प्लाज्माचे फवारे सोडते, जे कोसळणाऱ्या ताऱ्याच्या आवरणाला छेदून गॅमा किरणांमध्ये प्रकाशीत होतात. मात्र, या तेजस्वी स्फोटातून जीएमआरटीला जे नवे निष्कर्ष हाती लागले. त्याने पुन्हा एकदा शोधाची दिशा बदलली आहे. ॲस्ट्रोफीजीकल जर्नल लेटरमध्ये संबंधीत संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

काय आहे संशोधन?

स्फोट झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारच्या दुर्बिणींद्वारे निरीक्षणे घेतली. सुरवातीच्या गॅमा किरणांच्या स्फोटानंतर काय होते? यातच खरे शोधाचे गमक आहे. जेंव्हा गॅमा किरणांचे हे झोत मरणासन्न ताऱ्या भोवतालच्या वायूमंडळात घुसतात. तेंव्हा एक प्रखर चमक (अफ्टरग्लो) तयार होते आणि मंदावतेही. मात्र, जीएमआरटीद्वारे निरीक्षणे घेतली असता रेडिओ लहरींची चमक अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकली, अन् शास्त्रज्ञांच्या आजवरच्या गृहितकांना छेद गेला. कारण दृष्य प्रकाश आणि क्ष किरणांच्या आधारे जी अपेक्षित मोजमापे काढली होती. त्यापेक्षा रेडिओ प्रकाशातील मोजमापे अधिक तेजस्वी होती. हे अतिरिक्त उत्सर्जन नक्की कशामुळे झाले, या बद्दल शास्त्रज्ञ आता शोध घेत आहे.

सहभागी दुर्बिणी...

भारतातील जीएमआरटीबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट अरे, अमेरिकेतील यूएस नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज अरे (व्हीएलए), चिलीमधील अटाकामा लार्ज मिलिमीटर अरे (एएलएमए) आणि हवाईमध्ये सबमिलीमीटर अरे (एसएमए) यांचा समावेश होता.

Gamma Pulses
Pune News: फुरसुंगी अन् उरुळी देवाची गावं अखेर महापालिकेतून वगळली; आता..

यांनी केले संशोधन..

उटाह विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ आणि प्रमुख संशोधक डॉ. तन्मय लास्कर, ॲरिझोना विद्यापीठाचे प्रा. डॉ. केट अलेक्झांडर आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रा. डॉ. राफेला मार्गुट्टी यांचा संशोधनात सहभाग आहे.

प्रकाश निर्माण करणाऱ्या घटकाचे वस्तुमान प्रकाशाच्या वेगाच्या ९९.४ टक्के असले पाहिजे. रेडिओ प्रकाश तयार करणारे काहीतरी पूर्णपणे वेगळे असले पाहीजे किंवा जीआरबी बद्दलची आजवरची माहिती अपूर्ण असायला हवी. त्यासाठी पुन्हा पहिल्यापासून गॅमा स्फोटांचा अभ्यास करायला हवा.

- डॉ. केट अलेक्झांडर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ॲरिझोना विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.