Pune : ‘सह्याद्री’त ट्रेकला जाताय ? तर 'या' टिप्स करा फॉलो...

हौशी पर्यटक मोबाईलच्या कॅमेऱ्यात ठिकाणांचे सौंदर्य टिपण्यातच धन्यता मानत असतात. अशावेळी...
Pune
PuneSakal
Updated on

वाटाड्या किंवा स्थानिकांची सोबत ठेवाच

अवघड मानला गेलेल्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही पूर्वतयारी न करता काही पर्यटक जात असतात. हरिश्चंद्रगडाचा घेर हा मोठा आहे. गडावर जाण्यासाठी अनेक मुख्य वाटा आहेत.

तसेच, जनावरांच्या येण्या-जाण्यानेदेखील वाटा तयार झालेल्या आहेत. गडाची माहिती असलेला वाटाड्या (गाइड) किंवा कोणी स्थानिक व्यक्ती सोबत नसल्याने अनेकदा पर्यटक रस्ता भरकटतात. काही वेळा तर पर्यटक ट्रेकिंगसाठी आवश्यक असलेले सामान सोबत न घेताच गडाची चढाई करत असतात.

Pune
Mumbai Crime : पतीला दररोज थोडं-थोडं विष पाजून मारण्याचा प्रयत्न, पण...; आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल

मोबाईलची बॅटरी सांभाळा

हौशी पर्यटक मोबाईलच्या कॅमेऱ्यात ठिकाणांचे सौंदर्य टिपण्यातच धन्यता मानत असतात. अशावेळी अनेकदा पर्यटक भरकटून दुर्घटना झालेल्या आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्याने बॅटरी उतरते.

भरकटलेल्या पर्यटकांकडे मदतीसाठी संपर्क करण्यासाठी कोणतेही साधन नसते. काही तरुण मोबाईलमध्ये फोटो टिपण्यासाठी अगदी दरीच्या कडेला जातात. अनेकदा त्यामुळे अपघातदेखील झालेले आहेत.

Pune
Pune Dam : भामा आसखेड धरणात ८२ टक्के पाणीसाठा; धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी

ट्रेकसाठी पूर्ण तयारी हवीच

सह्याद्रीतील सध्याचे पर्यटकांचे चित्र दुर्दैवी आहे. अगदी पाच वर्षांपूर्वी ट्रेकिंगच्या क्षेत्रात एखादा नवीन गड पाहायला जाताना वेळ, काळ, सोबती या सर्व गोष्टींची काळजी केली जायची. त्यावेळी शक्यतो पावसाळ्यात डोंगरी किल्ल्यांना, वनदुर्गांना शक्यतो कोणीही जात नसत.

सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळ्यातील महिने हे ट्रेकचे असायचे. ट्रेक पूर्ण तयारीनिशी केले जायचे. त्यामुळे सह्याद्रीत गडकिल्ल्यांच्या ट्रेकमध्ये कुणाचा जीव गेला, ही बातमी अगदी अपवादानेच कानावर पडत असे.

ड्रोनच्या फोटोंना भुलू नका

सोशल मीडियावर सह्याद्रीतील टाकलेले फोटो व व्हिडिओ हे अनेकदा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने घेतलेले असतात, तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा कसरत करून जावे लागत असते. आपण फक्त फोटो व व्हिडिओ पाहून अशा ठिकाणांना भेटी देण्याचे शक्यतो टाळावे.

Pune
Pune Terrorist : एटीएसकडून पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग

पावसाळ्यात साधी वाटणारी ठिकाणे धोकादायक ठरू शकतात. अपघातांचे हे प्रकार थांबविण्यासाठी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये ट्रेकिंगविषयी जागृकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी ‘एनसीसी’ आणि ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

- भगवान चिले, इतिहास व दुर्गसंशोधक

हरिश्चंद्रगडावर नुकतीच झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतून स्थानिक गाईडचे महत्त्व अधोरेखित होत आहे. प्रचंड पाऊस, वादळी वारा व धुके ही परिस्थिती असताना काही दिवस भटकंती टाळणेच योग्य राहील. कोणत्याही नवख्या ठिकाणी जाताना व आपल्याला पुरेसा अनुभव नसल्यास स्थानिक गाइड सोबत ठेवावाच.

- ओंकार ओक, गिर्यारोहक

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील गडकिल्ल्यांचे सौंदर्य पावसाळ्यात खुलते. हिरवाईने डोंगर नटतात. या डोंगररांगांतून चहूबाजूने धबधबे कोसळतात. अनेकदा अनेक युट्युबर, रिलस्टार अशा ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात. ते पाहून अनेक नवखे या ठिकाणांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र, अशा ठिकाणांना भेट देताना योग्य खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

- सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()