Pune : जात्याला व्यायामाच्या उपकरणाचा दर्जा, हडपसरच्या दत्तात्रेय गाडगीळ यांना पेटंट

हडपसरच्या दत्तात्रेय गाडगीळ यांना पेटंट; सात वर्षांचे प्रयत्न यशस्वी
दत्तात्रेय गाडगीळ
दत्तात्रेय गाडगीळsakal
Updated on

पुणे : पूर्वी घराघरांत असलेले जाते आता कालबाह्य झाले असले तरी, त्याचे मोल कायम आहे. या जात्याचा वापर करून व्यायामाचे ‘वेतोबा उपकरण’ तयार केले आहे हडपसरमध्ये राहणाऱ्या दत्तात्रेय गाडगीळ (वय ६१) यांनी. सात वर्षे प्रयत्न केल्यावर केंद्र सरकारनेही त्याची दखल घेतली असून व्यायामाचे उपकरण म्हणून या उपकरणाला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे.

मूळचे अभियंता असलेले गाडगीळ यांनी जात्यावर व्यायाम करायचा तर त्यासाठी कोणालाही वापरता येईल असे उपकरण तयार करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांना राजीव दीक्षित यांच्याकडून प्रेरणा त्यांना मिळाली. पाच-सहा हजार रुपयांत तयार होणाऱ्या या उपकरणाचे त्यांनी ‘वेतोबा उपकरण’ असे नाव ठेवले आहे.

गाडगीळ म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी महिला जात्याचा वापर करत असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम होते. आजही अनेक योग शिक्षक व्यायाम प्रकार म्हणून जातं चालवा, असे सांगतात. जातं वापरताना, त्यासाठी खोलगट जागा लागते, त्याचा आवाज येतो, या अडचणी नव्या उपकरणात दूर केल्या. त्यातून व्यायामाचे उद्दिष्ट साध्य केले.’’

जात्याचा आवाज दूर करण्यासाठी वाळूचा वापर प्रभावी होत असल्याचे दिसून आले. जातं फिरवताना ते हलू नये, यासाठी त्यालगत बसण्यासाठी व्यवस्था केली. त्यामुळे ते जातं १००-१२५ किलो वजन सहज पेलू शकते. अनेक चाचण्या घेतल्यावर ‘वेतोबा उपकरण’ पूर्णत्वास आले.

‘वेतोबा उपकरण’ वापरताना जोर कमी, जास्त करण्यासाठी या उपकरणामध्ये भरलेली वाळू कमी जास्त करून ते साध्य होऊ शकते. या उपकरणात व्यायामाचे रोटेशन मोजण्यासाठी करण्यासाठी डिजिटल मीटर आहे. तसेच टीव्ही बघत समोर खुर्चीवर बसून देखील या यंत्रावर व्यायाम करता येतो. एका मिनिटामध्ये साधारण २५-३० रोटेशन होतील इतपत जोर दिल्यास योग्य व्यायाम होत असल्याचेही गाडगीळ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()