Pune Hadapsar Crime: उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत; फुरसुंगीत मेडिकलमध्ये घुसून दुकानदारावर चाकूने वार

Hadapsar Fursungi Crime medical shop: उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून फुरसुंगी येथील मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून हल्ला करण्यात आला आहे.
Crime
Crime
Updated on

Pune Crime: पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या घटना कानावर पडत आहेत. असाच एक प्रकार फुरसुंगी येथे घडला आहे. उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून फुरसुंगी येथील मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून हल्ला करण्यात आला आहे. दुकानदारावर चाकूने हातावर, डोक्यावर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वैभव तुकाराम मखरे हा मेडिकल दुकानदार यात गंभीर जखमी झाला आहे. आरोपी मनोज सुदाम आडागळे याने हे कृत्य केलं आहे. वार करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील हडपसर परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढलेले दिसून येत आहे. त्याचच हे आणखी एक उदाहरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.