Hadapsar News: TDR न दिल्याने जागा मालकाने अडवला रस्ता; प्रवाशांची होतेय गैरसोय

गेली चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही महापालिकेकडून विकसन हक्क हस्तांतरण (टीडीआर) होत नसल्याने जागामालकाने काळेपडळकडे जाणारा डीपी रस्ता पत्रे लावून बंद केला.
Road Close Hadapsar News
Road Close Hadapsar Newssakal
Updated on

Hadapsar News- गेली चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही महापालिकेकडून विकसन हक्क हस्तांतरण (टीडीआर) होत नसल्याने जागामालकाने काळेपडळकडे जाणारा डीपी रस्ता पत्रे लावून बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

येथील सर्व्हे नंबर ५४ मधील हांडेवाडी रोड, महात्मा फुले चौक, जेएसपीएम कॉलेज, कुमार केबल पार्क सोसायटी जवळून डीपी रस्ता गेलेला आहे. त्यासाठी संपादीत जागेचा विकसन हक्क हस्तांतरण (टीडीआर) पालिकेकडून अद्यापही देण्यात आलेला नाही.

त्यासाठी जागामालक गेली चार वर्षांपासून महापालिकेत पाठपुरावा करीत आहे. मात्र, पालिका प्रशासनाची त्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने जागामालकाने काल (ता. २७) या रस्त्यावर पत्रे लावून वाहतूक बंद केली आहे.

सुरूवातीला पालिकेने या रस्त्याचेडांबरीकरण केले होते. त्यानंतर नुकतेच काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली आहे. मात्र, कालपासून वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Road Close Hadapsar News
Pune Crime : पुण्यात तासाभरात तीन महिलांसह चौघांना लुबाडले

'महापालिकेच्या संबंधीत अथिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक जागामालकाला टीडीआर देण्यात दीरंगाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी, कामगार व इतर प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हा प्रश्न लवकर न सोडविल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.'

- विजया वाडकर, माजी नगरसेविका

'डीपी रस्त्यासाठी आमची जागा पालिकेने संपादीत करून तेथून अठरा मीटरचा रस्ता विकसीत केला आहे. मात्र, मोबदला म्हणून देण्यात येणारा टीडीआर चार वर्षे पाठपुरावा करूनही मिळालेला नाही. अधिकारी त्याबाबत चालढकल करीत आहेत. त्यामुळे आम्ही रस्ता बंद केला आहे.'

- योगेश घुले, विश्वास भापकर - जागामालक

याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व बांधकाम निरिक्षक प्रकाश कुंभार यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.