साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा खरेदी करतात.
पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर अनेकजण नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा (Hapus Mango) खरेदी करतात. सध्या बाजारात गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात हापूसला मागणी आहे. दर्जानुसार ८०० ते १५०० रुपये डझनप्रमाणे नागरिकांना आंबा खरेदी करावा लागत आहे. मागील वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन आंब्याचे भाव असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या शहरातील खरेदीदार सोडून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड या भागातून उदरनिर्वाह करण्यासाठी तरुण कामगार वर्ग पुण्यात येतो. हे सर्वजण साधारणतः ३००-४०० जण असतात. सर्वजण मार्केट यार्डात ऊन आंबा खरेदी करून पुणे शहर व उपनगरात रस्त्यावर उभे राहून आंबा विकतात. त्यामुळे पुण्यातील पारंपारिक खरेदीदारांना मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे व्यापारी नितीन कुंजीर यांनी सांगितले.
फळबाजारात गुरुवारी कोकणातून सुमारे १५०० ते २००० पेट्यांची आवक झाली. दरवर्षी पाडव्याला आंब्याच्या साडेचार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. तसेच व्यापारीही खास पाडव्यासाठी हापूस तयार करून ठेवत असतात. मात्र यंदा आवक कमी असल्याने व्यापार्यांकडेही तयार मालाचे प्रमाण अत्यल्प आहे. १५ एप्रिलनंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाडी भागातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. दुसऱ्या बहरात मालाची आवक जास्त राहील. त्यानंतर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असे मार्केट यार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. बाजारातून खरेदी करून किरकोळ विक्री करण्यासाठी अनेक व्यापारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधतात.
वातावरणातील बदलाचा वारंवार फटका बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाजारात एकूणच आंब्याचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झाडावर केवळ 25 ते 30 टक्केच फळे टिकली आहेत. त्यामुळे बाजारातही आवकही कमीच होत. घाऊक बाजारात पेटीचे, तर किरकोळ बाजारात डझनाचे दर अधिक आहेत. हे दर अनेकांना परवडणारे नाहीत. आवक जोपर्यंत वाढणार नाही, तोपर्यंत भाव असेच राहतील.
- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड
वादळ, वारा, पावसामुळे फळे गळाली
झाडांना लागलेला मोहर गळू नये, यासाठी शेतकर्यांनी विशेष काळजी घेतली. त्यासाठी अधिकचा खर्चही केला आहे. मात्र ज्या शेतकर्यांनी काळजी घेतली नाही. त्यांच्या अमराईतील झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. वादळ, वारा, पावसामुळे फळे गळाली आहेत. तसेच कोकणातील आंब्याच्या झाडावर रोगाचा प्रभाव अधिक आहे. त्याचा फटकाही शेतकर्यांना सहन करावा लागत असल्याचे तेथील शेतकरी सांगत आहेत.
दर्जानुसार घाउक बाजारातील हापूसचे दर
तयार 4 ते 10 डझन 3 ते 7 हजार
तयार 1 डझन 800 ते 1500 रूपये
कच्चा 5 ते 10 डझन 2.5 ते 5 हजार
कच्चा 4 ते 7 डझन 3 ते 4.5 हजार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.