इंदापूर : शिक्षक हे सुशिक्षित,संस्कारित व विज्ञाननिष्ठ पिढी घडविण्याचे काम करत असून शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळेत सलग ३३ वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर संस्थेच्या कालठण नंबर एक ( ता. इंदापूर ) येथील उत्कर्ष हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले केशव बनसुडे यांचा सपत्नीक सत्कार श्री. पाटील यांच्या हस्ते तर कर्मयोगी कारखान्या च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील, संचालकपदी निवडीबद्दल कालठण भुमीपुत्र हनुमंत जाधव व शिक्षक सतीश व्यवहारे यांचा कालठण ग्रामस्थांच्या वतीने झाला. यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम जाधव,विलास वाघमोडे,कर्मयोगीकारखान्याचे माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ, माजी सरपंच विठ्ठल सपकळ उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात आज १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ३०० हुन अधीक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. ज्ञान हीच संपत्ती मानून आदर्श समाज घडविण्याचे शिक्षकांचे प्रयत्न स्तुत्य आहेत.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशव बनसुडे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्र बिंदू मानून शिक्षकांनी ज्ञानगंगेचे पवित्र काम पुढे नेणे गरजेचे आहे.
शिक्षक दादा जावीर व सहकाऱ्यांनी मंत्रमुग्ध गीते सादर करून सर्वांची मने जिंकली.
प्रस्ताविक विजय झगडे तर सुत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार हनुमंत जगताप यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.