Pune Rain: पुण्यात धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू, पुलाची वाडी येथील प्रकार

Pune youths died due to electric shock: तिघे अंडा भुर्जी च्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते.
Pune youths died
Pune youths diedeSakal
Updated on

पुणे- शहरात एक घक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

तिघे अंडा भुर्जी च्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचले होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी आहेत.

Pune youths died
Pune Schools Closed: पुण्याला रेड अलर्ट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. सदर तरुणांना उपचारांती डॉक्टरांनी पाहटे पाच वाजताच्या दरम्यान मयत घोषित केले आहे.

अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) राहणार पुलाच्या वाडी डेक्कन, आकाश विनायक माने (वय वर्ष 21) राहणार पूलाची वाडी डेक्कन ,शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ )नेपाळी कामगार अशी मृत तरुणांची नावे आहेत.

Pune youths died
Pune Rain: अतिमुसळधार पावसाने झोडपले! मध्यरात्री पीएमसी पुणेकरांच्या मदतीला; जारी केली आपत्कालीन हेल्पलाइन, पर्यटकांनाही इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.