Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या घरात पाणी

pune heavy rains water entered the houses of citizens traffic jams in pune
pune heavy rains water entered the houses of citizens traffic jams in pune
Updated on

पुणे : जवळ दोन तासांपासून पुण्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. गेल्या दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडपडल्याच्या नोंदी असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करीत आहेत.

दरम्यान हवामान विभागाने ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आता मागील २-३ तासांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या पाऊसामुळे पुण्यातले रस्ते जलमय झाले आहेत. तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तसेच रस्ते जलमय झाले त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

घोरपडी गावातील बी टी कवडे रस्ता परिसरातील तारा दत्त कॉलनीमध्ये सर्व घरात शिरले असून गल्लीतील रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले आहे. नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तु मध्ये पाणी शिरले सर्व सामान नादुरुस्त झाले आहे.

खडकवासला धरण भरले..

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ठीक संध्याकाळी ०७:०० वाजता ८५६ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ८५६ क्युसेक विसर्ग वाढवून रात्री ०८:०० वाजता २,५६८ क्यूसेक करण्यात येत आहे. यामध्ये, आवश्यकतेनुसार कमी जास्त बदल संभवू शकतो.

पाणी साचलेली ठिकाणे

1) चंदननगर पोलिस स्टेशन

2) वेदभवन, कोथरुड

3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड

4) लमाण तांडा, पाषाण

5) सोमेश्वर वाडी, पाषाण

6) वानवडी, शितल पेट्रोल पंप

7) बी टी ईवडे रोड

8) काञज उद्यान

झाड पडल्याच्या घटना

1) एनसीएल जवळ पाषाण

2) साळुंखे विहार, कोंढवा

3) ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा

4) चव्हाणनगर

5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.