Pune News : विज्ञानातूनच हिंदू विचार सिद्ध होईल - अविनाश धर्माधिकारी

सर्वसमावेशक असलेला हिंदू विचार हा खऱ्या अर्थाने मानवतावादी आहे. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या हिंदू विचाराला विज्ञानाची भीती नाही.
Avinash Dharmadhikari
Avinash Dharmadhikarisakal
Updated on

पुणे - सर्वसमावेशक असलेला हिंदू विचार हा खऱ्या अर्थाने मानवतावादी आहे. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या हिंदू विचाराला विज्ञानाची भीती नाही. उलट विज्ञान जेवढे पुढे जाईल तेवढे ते भारताची अध्यात्म निष्ठता सिद्ध करेल. त्यामुळे मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे हिंदू प्रतिभेने काबीज करणे हीच खरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल, असे मत अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ‘मोपल्यांचे बंड ते द केरला स्टोरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी श्रीपाद अवधूत स्वामी, विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक, लेखिका शेफाली वैद्य, व्याख्याते अविनाश धर्माधिकारी, सावरकर अभ्यासक अक्षय जोग आदी उपस्थित होते. देवव्रत बापट यांनी ‘हर घर सावरकर’ या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली.

Avinash Dharmadhikari
Pune : एका फेरीत २२ टन कचरा वाहतूक करणारे ट्रक महापालिकेच्या ताफ्यात

पर्यावरणीय समस्यांचे निराकरण हिंदू विचारांमध्ये असल्याचे मत धर्माधिकारी यांनी मानले. ते म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानाने माणूस निसर्गापासून वेगळा मानला म्हणूनच आज आपण विध्वंसाच्या ठिकाणी आहे. हिंदू विचारांनी मात्र माणूस आणि निसर्ग एकच मानले म्हणूनच विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करता आली. हा विज्ञाननिष्ठ विचार सर्वांपर्यंत नेला पाहिजे. तर हर घर सावरकर हा उपक्रम यशस्वी होईल.’’

द केरला स्टोरी लोकांना का भावते याचा विचार करायला हवा, असे मत वैद्य यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘केवळ केरळमध्ये नाही तर आपल्याही आजूबाजूला असे कथानक दिसत असून, आपण ते डोळे उघडून बघायला हवे धर्म पाळायचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यावर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. असे असताना विस्तारवादी धर्मांतरण का केले जाते. याचा विचार समाजाने करायला हवा.’

Avinash Dharmadhikari
Property Tax : क्लिष्ट प्रक्रियेमुळे मिळकतकराची बिल तयार करण्यासाठी लागतोय विलंब

हिंदूंना त्यांचे न्याय नागरी आणि सामाजिक अधिकार मिळवून देणारे हिंदुत्व हे सावरकरांचे होते, असा विचार जोग यांनी मांडला. मानवतेकडे जाणारे एक पाऊल म्हणजे हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद असल्याचेही जोग यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एकाही आरोपात काना मात्र्याची सत्यता नाही. त्यांचे चरित्र वाचून सावरकरांची योग्य चिकित्सा आणि मोठेपण मान्य करायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणाऱ्यांनी निदान तेवढी सहिष्णुता दाखवायला हवी.

- अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ विचारवंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()