पुणे : हिंजवडीच्या सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर बिनविरोध

आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवनाथ दिगंबर जांभुळकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
हिंजवडीच्या सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर बिनविरोध
हिंजवडीच्या सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर बिनविरोध Sakal
Updated on

वाकड : आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवनाथ दिगंबर जांभुळकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामविकास श्री. म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या कोअर कमिटीमध्ये ठरल्यानुसार विशाल साखरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

सरपंच पदासाठी शिवनाथ जांभुळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नायकवडी यांनी केली. या सभेला विरोधी गटाच्या दोन्ही सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने ग्रामपंचायतीचे १७ पैकी १५ सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर व गावकामगार तलाठी सागर शेलार यांनी कामकाज पाहिले.

हिंजवडीच्या सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर बिनविरोध
जुन्नर : शिवरायांची सर्वात मोठी प्रतिमा रांगोळीतून साकारण्यास सुरवात

यावेळी माजी नगरसेवक संजय नेवाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, सुहास दगडे, शिवाजी बुचडे, सुरेश हुलावळे, मल्हारी साखरे, संतोष साखरे, वसंत साखरे, शामराव हुलावळे, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, ऍड. शिवाजी जांभुळकर, प्रवीण जांभूळकर, हभप सुखलाल महाराज बुचडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद जांभूळकर यांनी सुत्रसंचालन केले. उमेश साखरे यांनी आभार मानले.

निवडीनंतर शिवनाथ जांभूळकर व उपसरपंच शुभांगी साखरे यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोअर कमिटी पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला. सर्वांनी शिवाजी महाराज चौकातील श्री गणेश व म्हातोबा टेकडी वरील श्री म्हातोबा महाराजांचे सामूहिक दर्शन घेतले.नवनिर्वाचित सरपंचांनी सर्वस्व अर्पण करून हिंजवडी नगरीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशा अपेक्षा कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()