Pune Hit And Run Case : पोलिसांना उडवलं अन् घरी जाऊन झोपला... पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा

Pune Hit And Run Case Latest News : सिद्धार्थ राजू केंगार (रा. औध) असे कारचालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Pune Hit And Run Case : पोलिसांना उडवलं अन् घरी जाऊन झोपला... पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा
Updated on

पुणे, ता. ८ ः पोलिसांना धडक दिल्यानंतर कारचालकाने कार घरापासून काही अंतरावर पार्क केली. त्यानंतर तो घरी जाऊन झोपला होता. कार लांब लावल्यानंतर पोलिस आपल्या घरापर्यंत पोचू शकणार नाहीत, असे त्याला वाटले होते. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत गाडीच्या नंबरवरुन माहिती काढली आणि कारचालकाला पकडले.

सिद्धार्थ राजू केंगार (रा. औध) असे कारचालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. केंगार हा एका मोटारीच्या शोरूममध्ये कामाला आहे. तर अपघात झालेली गाडी मुकेश अटवाल याच्या नावावर आहे. पोलिस आता गाडीमालकचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी यांची १५ दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेतून खडकी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. रविवारी रात्री त्यांची बीट मार्शल म्हणून ड्यूटी होती. त्यांच्या सोबत पोलिस शिपाई संजोग शिंदे यांना देण्यात आले होते. संजोग शिंदे हे दुचाकी चालवत होते तर समाधान कोळी हे मागे बसले होते. त्यांनी रात्री दीडच्या सुमारास बोपोडी येथील एका पॉइंटला भेट दिली. तेथे नेहमीप्रमाणे पोलिसांच्या ॲपवर दोघांनी भेट दिल्याचा सेल्फी टाकला. यानंतर ते पुढील पॉइंटवर भेट देण्यासाठी निघाले आणि अवघ्या दहा मिनिटांतच त्यांच्या दुचाकीला अंडरपासजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या कारने उडवले.

Pune Hit And Run Case : पोलिसांना उडवलं अन् घरी जाऊन झोपला... पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा
Pune Hit And Run Case: तो फोटो ठरला शेवटचा! हरवलेल्या मुलीला आई-वडिलांकडे सोपवलं अन् पोलिसाचा अर्ध्या तासातच मृत्यू

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेऊन अपघात करून पळ काढलेल्या कारचा शोध घेतला. तेव्हा कार चालकाने कार घरापासून लांब लावल्याचे आढळून आले. अपघातानंतर कार चालक घरी जाऊन झोपला होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

बोनेटवर उडून पडले व त्यानंतर चाकाखाली सापडले

कोळी हे दुचाकीवर मागे बसले होते. धडक बसल्याने ते उडून कारच्या बोनेटवर पडले. तर शिंदे हे रस्त्याच्या कडेला दुचाकीसह पडले. कारचालकाने कोळी यांना तसेच काही अंतर नेले. यानंतर ते खाली पडून कारच्या चाकाखाली सापडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर कार चालकाने न थांबता तशीच कार पुढे दामटत नेत पळ काढला. दोघेही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती एका वाहनचालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर दहा मिनिटांतच मरिआई गेट पोलिस चौकीतील बीट मार्शल घटनास्थळी पोचले. त्यांनी दोघांनाही खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे समाधान कोळी यांना मृत घोषित करण्यात आले. तर गंभीर जखमी संजोग शिंदे यांना रूबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

Pune Hit And Run Case : पोलिसांना उडवलं अन् घरी जाऊन झोपला... पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा
Army Convoy Attacked : काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशवादी हल्ला! 4 जवान शहीद

कोळी यांच्यामागे पत्नी एक मुलगी, एक मुलगा, आई -वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कोळी हे मुळेचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांची सुरुवातील रेल्वे पोलिसांत भरती झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी ते शहर पोलिस दलात रुजू झाले होते.

खडकी पोलिस ठाण्यात बदल होण्यापूर्वी कोळी हे चतुःशृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते. तेथे रुजू असताना त्यांच्याकडे प्रामुख्याने विद्यापीठ चौकातील वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी होती. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तेथे काम केले. नेहमी हसतमुख असलेले कोळी कार्यतत्पर होती. - शफील पठाण, पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.