Pune : महापालिकेची होर्डिंग कारवाई थंडावली

पिंपरी चिंचवड येथे तर दोघांना जीव गमवावा लागला होता. पुणे शहरात शेकडो अनधिकृत होर्डिंग प्रत्येक चौकात, इमारतीवर उभे असल्याने त्याचा धोका निर्माण झाला आहे.
अनधिकृत होर्डिंग.
अनधिकृत होर्डिंग. Sakal
Updated on

Pune - पुणे शहरातील अनधिकृत होर्डींगवरील कार्यवाही मे अखेर पर्यंत पूर्ण करा असे आदेश दिलेले असताना कारवाईचा वेग वाढण्याऐवजी थंडावला आहे. अनेक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कारवाईच होत नाही. १ जून ते २० जून या कालावधीत केवळ ५० होर्डिंग हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.  

शहरात अनधिकृत होर्डिंग होर्डिंगची संख्या बेसुमार वाढलेली आहे. त्यामुळे होर्डिंग काढून टाकण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला क्रेन, गॅस कटरसह अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. नगर रस्ता, सिंहगड रस्ता, घोले रस्ता या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक होर्डिंग आहेत. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, सिंहगड रस्ता परिसरात अनधिकृत होर्डिंग पडले.

अनधिकृत होर्डिंग.
Mumbai Crime : पैसे कमविण्यासाठी मुंबईत घातपाताची धमकी; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

पिंपरी चिंचवड येथे तर दोघांना जीव गमवावा लागला होता. पुणे शहरात शेकडो अनधिकृत होर्डिंग प्रत्येक चौकात, इमारतीवर उभे असल्याने त्याचा धोका निर्माण झाला आहे. होर्डिंग, इमारत सुरक्षीत आहे की नाही याची माहिती देखील महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व होर्डिंग ३० मे पर्यंत काढून टाकावेत असे आदेश एप्रिल महिन्याच्या अखेरीस दिले होते. पण ही कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही.

९४७ अनधिकृत होर्डिंग कायम

शहरात एकूण २ हजार २१४ अनधिकृत होर्डिंग होते, त्यापैकी १ हजार २४७ होर्डिंग काढले आहेत. तर ३१ मे अखेर ९४७ अनधिकृत होर्डिंग शहरात उभे होते. जून महिन्यात कारवाईचा वेग थंडावला आहे.

आकाश चिन्ह विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १जून ते २० जून या २० दिवसांच्या कालावधीत ५१ होर्डिंग काढण्यात आले आहेत. त्यामधील १० दिवस एकाही क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केलेली नाही. मोजक्याच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे.

अनधिकृत होर्डिंग.
Mumbai News : माणकोली ते कोपर उड्डाणपूल दरम्यान दुतर्फा वाहन उभी करण्यास मनाई; वाहनकोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना

‘‘क्षेत्रीय कार्यालयांना अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईची गती वाढविण्यास सांगितलेले असताना जून महिन्यात कारवाई कमी झाली आहे. एक दोन होर्डिंग दिवसभरात काढले जात आहेत. त्यामुळे कारवाई न करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल.

 - माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()