पुणे : शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विकणारा जेरबंद

कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : टोमॅटो व मिरचीच्या बियाणांची केली विक्री
Arrest
ArrestSakal
Updated on

Pune News : शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विक्री (Illegal Seed Selling) करणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक (Arrest) केली. कोरेगाव पार्क येथील सबवे फूड हॉटेल, लेन क्र.६ येथे पोलिसांनी कारवाई केली.

मोहम्मद असीम हिदायत शेख (वय ३७, रा. एउफॉरिया सोसायटी, कोंढवा बु।।, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक पवार (वय ५५, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

image-fallback
MP Shriniwas Patil यांनी लोकसभेत विविध मागण्यांचा केला पाठपुरावा

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शिवाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय येथे कार्यरत आहेत. अटक आरोपीने शासनाच्या परवानगीशिवाय नामांकित कंपनीच्या नावाने टोमॅटो व मिरचीचे बोगस बियाणे विक्री करून ४१ हजार ५८० रुपयांना शेतकऱ्यांची फसवणूक केली. कोरेगाव पार्क येथील सबवे फूड हॉटेल, लेन क्र.६ येथे २२ डिसेंबर रोजी कोरेगाव पार्क पोलिसांनी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.