पुणे दुसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध? महापौरांनी दिली माहिती

ॉ
SHAHAJI_K_JADHAV
Updated on

पुणे : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नवीन यादी जाहीर केली असून राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार पुणे शहराचा 2 टप्प्यात समावेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. पुण्याचा कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट 4.71 % असून शहरात ऑक्सिजन बेडची क्षमता12.38 टक्के आहे. पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांबाबात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. तसंच शहरात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काय तयारी करण्यात आली आहे हेसुद्धा त्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.

महापौर मोहोळ यांनी पुण्यात 11 जूनच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध आहे कार्यक्षेत्राची वर्गवारीची माहितीसुद्धा दिली आहे. त्यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची टक्केवारी इत्यादीचा समावेश आहे.

ॉ
प्रेग्नंट नीनाला लग्नाची मागणी का घातली? सतीश कौशिक यांनी सांगितलं कारण

राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार पुण्यात लागू असलेले निर्बंध

1. लोकल ट्रेन मधुन फक्त वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा कर्मचारी व शासकीय कर्मचारी फक्त यांनाच प्रवास करणेस परवानगी.

2. सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.

3. अत्यावश्यक नसलेली दुकाने शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील.

4. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध, तसेच रात्री १०.०० नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.

5. खाजगी वाहनातून बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधुन आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी, परंतु सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास असणे बंधनकारक राहील.

ॉ
Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

कोविड १९ तिसरी लाट पूर्वतयारी :

1. महापालिकेचे तसेच खाजगी रुग्णालयांचे बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध

2. स्व. राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे लहान मुलांसाठी २०० बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे.

3. स्व. राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे नवजात व कुमार वयाच्या बालकांसाठी आयसोलेशन, ऑक्सिजन, NICU, PICU, प्रयोगशाळा, पालकांना राहणेसाठी जागा इ. सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

4. म्युकरमायकोसिस उपचारासाठी मनपाचे दळवी रुग्णालय येथे शस्त्रक्रिया गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

5. सर्व खाजगी हॉस्पिटल्सना ८०% नियंत्रित केलेले बेड्स पैकी निम्मे बेड्स कोविड साठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

6. खाजगी रुग्णालयांमधील १०% बेइस बालकांसाठी राखीव ठेवणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

7. आरोग्य विभागात सध्या ११ बालरोग तज्ञ पूर्णवेळ उपलब्ध असुन नवजात रोग तज्ञ व अतिरिक्त बालरोग तज्ञ कंत्राटी तत्यावर उपलब्ध होणेकरिता कार्यवाही सुरु आहे.

1. लोकल ट्रेन मधुन फक्त वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा कर्मचारी व शासकीय कर्मचारी फक्त यांनाच प्रवास करणेस परवानगी.

2. सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.

3. अत्यावश्यक नसलेली दुकाने शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील.

4. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध, तसेच रात्री १०.०० नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.

5. खाजगी वाहनातून बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी, परंतु सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास असणे बंधनकारक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.