Pune : आयर्नमॅनंतर आता अल्ट्रामॅनवरही उद्योजक दशरथ जाधवांचा ठसा

उद्योजक जाधव स्विमिंग करत असताना पहिल्या चार किलोमीटर नंतर समुद्रामध्ये अचानक लाटा सुरू
दशरथ जाधव
दशरथ जाधवsakal
Updated on

हडपसर : दहापेक्षा अधिक वेळा आयर्नमॅन झालेले येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेतही यश मिळवीत आपला ठसा उमटवला आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी ही स्पर्धा ३४ तास ५१ मिनिटांमध्ये पूर्ण करणारे ते भारतातील एकमेव सर्वाधिक वयाचे स्पर्धक ठरले आहेत.

फ्लोरिडा अमेरिका येथे तीन दिवस अल्ट्रामॅन ही स्पर्धा झाली. दिलेल्या निर्धारित वेळेत १० किलोमीटर पोहणे, ४२३ किलोमीटर सायकलिंग करणे व ८४ किमी धावणे अशी स्पर्धा त्यांनी पूर्ण केली.

उद्योजक जाधव स्विमिंग करत असताना पहिल्या चार किलोमीटर नंतर समुद्रामध्ये अचानक लाटा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले कयाक दुसरीकडे जाऊ लागली. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्विमिंग पाच तास सोळा मिनिटांमध्ये पूर्ण केले. सायकलिंग करताना रस्ते अतिशय उंच-सखल होते.

तिथे पाऊस कधीही चालू होतो. दोन-तीन वेळा खूप मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये त्यांना त्या त्या वेळी थांबावे लागले. अशाही बिकट परिस्थितीत त्यांनी सायकलिंग पूर्ण केले. धावताना त्यांना वेगवान वाऱ्याशी सामना करावा लागला. बोचरी थंड हवेच्या प्रतीकुल तापमानात अकरा तास छत्तीस मिनिटांमध्ये त्यांनी ८४ किलोमीटर रनिंग पूर्ण केले.

ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये जगातील सगळ्यात अवघड स्पर्धा अल्ट्रा मॅन समजली जाते. जे आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करतात आणि निकषात बसतात अशा जगभरातील पन्नास लोकांना या स्पर्धेला निमंत्रित केले जाते. भारतातून तीन लोकांना निमंत्रित केले गेले होते. त्यापैकी एक हडपसरचे दशरथ जाधव हे होते.

या पूर्वी जाधव हे १० पेक्षा जास्त वेळा आयर्नमॅन झालेले आहेत. तसेच अनेक सायकलिंग स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. किमान २५ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे. हडपसर परिसरात फिटनेस चळवळ रुजविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही ते दररोज सकाळी ३ तास व्यायाम करतात.

"नियमित व्यायाम, सायकलिंग, स्विमिंग, योग्य व वेळेवर आहार, आवश्यक झोप अशा सवयी मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आजही या वयात मी वेगवेगळ्या स्पर्धेत यशस्वी सहभाग घेत आहे. तरूणांनी आपले आरोग्य जपण्यासाठी अशा सवयी अंगिकारल्या पाहिजेत. त्यामुळे सर्व स्तरावर जीवन यशस्वी होण्यास मोठी मदत होईल.'

दशरथ जाधव, उद्योजक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()