Air Pollution: मुंबईपेक्षाही पुण्याची खराब स्थिती; दोन दिवसांत प्रदूषणात मोठी वाढ, पुण्याची फुप्फुसे भरली अशुद्ध हवेने

पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता ढासळली
Air Pollution
Air PollutionEsakal
Updated on

कानठळ्या बसविणारा आवाज. हवेत केवळ धूरच धूर अन् जागोजागी रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा, असे चित्र दिवाळीमुळे सर्वत्र पहायला मिळत आहे. एका दिवसाच्या उत्सवानंतर पुण्याची हवा खराब झाल्याने आरोग्याविषयी चिंता वाढू लागली आहे. केवळ हवेचे प्रदूषण नाही, तर कचरा आणि ध्वनी प्रदूषणाचाही ताप अनेकांना सहन करावा लागला. विशेष म्हणजेच मुंबईपेक्षाही पुण्याची हवा अधिक खराब झाल्याची नोंद भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ संकेतस्थळावर झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनो आता आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.(Latest Marathi News)

दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी असतेच. विविध प्रकारच्या फटाक्यांमधील रासायनांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. इतकेच नाही, तर फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते. रविवारी (ता. १२) लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीनिमित्ताने शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर झाला. यामुळे आता आरोग्यासाठी धोकादायक स्थिती पुण्यात निर्माण झाली आहे.

Air Pollution
NCP Sharad Pawar: शरद पवार गटाने कंबर कसली; लोकसभेच्या 'इतक्या' जागांवर ‘राष्ट्रवादी’ची नजर

पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळून खराब झाली असून, अति सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणाच्या प्रमाणात दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्यामुळे सोमवारी (ता. १३) पहाटे शहरात धुरके (धूर आणि धुक्याचे मिश्रण) पसरले होते. ‘सफर’च्या आकडेवारीनुसार भोसरीमध्ये सर्वाधिक जास्त पीएम २.५ आणि पीएम १०च्या प्रमाणात वाढ झाली. या भागात धूलिकणाच्या प्रमाणात तिप्पट वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

वाहनांची वर्दळ असतानाही बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर सर्रासपणे फटाके फोडले जात होते. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. फटाक्यांमुळे दुर्घटना होऊ शकते, याचेही भान अनेकांनी राखले नाही. अरुंद गल्ल्यांमध्येसुद्धा असेच चित्र होते. दरम्यान, शहरासह उपनगरांमध्ये रात्रभर फटाके फोडल्याने रस्त्यांवर भरपूर कचरा निर्माण झाला. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी सकाळीच स्वच्छतेच्या कामाला लागले होते.

Air Pollution
Rohit Pawar: भाजपकडून खोट्या गोष्टींची पेरणी ! रोहित पवारांची खोचक टीका, शरद पवारांच्या जातीच्या दाखल्याबद्दलही उल्लेख

ठिकाण - पीएम २.५ - पीएम १०

शिवाजीनगर - ३८२ - २८६

पाषाण - ३१५ - १९५

लोहगाव - ३८२ - १९१

आळंदी - ३१२ - १७५

कात्रज - ३५५ - २८२

हडपसर - ३३२ - २१९

भोसरी - ४२५ - ३४२

निगडी - ३४१ - २१४

कोथरूड - ३५८ - ३४१

भूमकर चौक - ३१३ - १८९

Air Pollution
Maharashtra Weather: राज्यात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यातील तापमानात झाली घट

संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड सांगतात...

वाढलेल्या धूलिकणांमुळे फुप्फुसाची क्षमता कमी होते

दमा किंवा फुप्फुसाचा आजार असलेल्यांसाठी धोक्याची स्थिती

लहान मुलांना सर्वाधिक धोका

प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या संसर्गाचा धोका वाढतो

यंदा दिवाळीच्या काळात सर्दी, खोकला, ताप, दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली

महत्त्वाची निरीक्षणे

उपनगरांमधील रस्त्यांवर फटाके फोडण्यात आले

प्रामुख्याने मोठ्या आवाजाचे फटाके व आतषबाजीचा समावेश

काही मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा विचार न करता फटाके फोडले

रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आले

हवेत धुराचे प्रमाण जास्त झाल्याने अनेकांना श्‍वसनाच्या समस्या जाणवल्या

दुसऱ्या दिवशीही सकाळपर्यंत हवेत फटाक्यांचा धूर कायम होता

सोसायटीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. आम्ही नवव्या मजल्यावर राहतो, तरीही संपूर्ण घरात फटाक्यांमुळे धूर झाला होता. त्यामुळे श्‍वास घेताना त्रास जाणवू लागला. पुढील आठवड्यात माझ्या मुलीचे लग्न असल्यामुळे घरी पाहुणे आले आहेत. त्यातील काही जण वृद्ध असल्याने त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे.

- बिमला नरनोलीया, रहिवासी, शिवणे

पुण्यातील हवेची गुणवत्ता खराब होत असून, यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी उपाययोजना व त्यांची अंमलबजावणी आवश्‍यक आहे. मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी आहे, याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.