Pune ISIS Terrorism Module Case: दोन राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला पुण्यात; NIA तपासात धक्कादायक माहिती समोर

Pune ISIS Terrorism Module Case: पुणे दहशतवाद प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता.
Pune ISIS Terrorism Module Case
Pune ISIS Terrorism Module Caseesakal
Updated on

Pune ISIS Terrorism Module Case:

पुणे दहशतवाद प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. दोन्ही राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट पुण्यात रचला गेला. पुण्यातील कोंढवा भागात राहत असलेल्या एका घरात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मागील वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनआयएने बुधवारी (13 मार्च) पुणे ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले, आणखी चार आरोपींची नावे दिली आणि एकावर आरोप जोडले. मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत.

मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतदादांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पूर्व आणि आरोपपत्र दाखल केले.

सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते.

Pune ISIS Terrorism Module Case
सोलापूरचा पुढचा खासदार कोण? काँग्रेसकडून प्रणिती शिंदे लोकसभेच्या मैदानात; भाजपकडून सोलापूर शहरातील ‘ही’ नावे आघाडीवर

तपासात असेही आढळून आले की, आरोपी गुप्त कम्युनिकेशन ॲप्सद्वारे परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते. ते सशस्त्र दरोडे आणि चोरी करून दहशतवादी निधी गोळा करत होते आणि त्यांच्या नापाक योजना राबवण्यासाठी त्यांच्या हस्तकांकडून पैसेही मिळवत होते. (Latest Marathi News)

हे आरोपी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. या लोकांनी पुण्यातील कोंढवा येथे आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. आरोपींचा महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा कट होता.

Pune ISIS Terrorism Module Case
Health Care News : जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम; हृदय अन् मन राहील निरोगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.