जल जीवन मिशनच्या कामांना गती द्या अन्यथा कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सज्जड इशारा
जल जीवन मिशन
जल जीवन मिशनSakal
Updated on

पुणे : जल जीवन मिशनचे ‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरी पाणी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रणेने गांभीर्याने प्रयत्न करावेत, या कामाला कोणत्याही परिस्थितीत गती द्यावी. कामास विलंब झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान समितीच्या बैठकीत जल जीवन मिशनच्या कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी या वेळी उपस्थित होते.

जल जीवन मिशन
MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष लवकरच दिसणार पडद्यावर

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोचविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, क्षमतावाढ, दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने हाती घ्यायची आहेत. आत्तापर्यंत या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर होणे आवश्यक होते. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबवण्यासह कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रकल्प अहवाल, तांत्रिक मान्यतेबाबत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

आयुष प्रसाद म्हणाले, या अभियानांतर्गत जिल्ह्यात एक हजार ७७० पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. यापैकी ५१४ योजनांचे भूजल सर्वेक्षण विभागाचे (जीएसडीए) जलस्रोत सर्वेक्षण झाले आहे. ५०१ योजनांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाले असून, ४५५ प्रकरणांमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांना वेग देण्याची आवश्यकता आहे.

जल जीवन मिशन
बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता वि. पां. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन. एस. भोई, वैशाली आवटे, जीएसडीएचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.एस. गावडे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता मिलिंद टोणपे, कार्यकारी अभियंता अमित आडे आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()