Pune: कल्याणीनगरमधील नामांकित हॉटेल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? पोलीस आयुक्तांनी नोटीस पाठवल्याने खळबळ

Pune famous hotel on terrorist target:पुणे पोलिसांनी दिलेल्या या पत्रामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. माहितीनुसार, या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात.
pune hotel
pune hotel
Updated on

Pune News: पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेल्या एका नामांकित हॉटेलला पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या या पत्रामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. माहितीनुसार, या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात.

सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी यातून दिला आहे. हे पत्र स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने संबंधित आस्थापनेला पाठवण्यात आले आहे.

pune hotel
Pune Crime : मृत्यू झालेल्या तरुणास साथीदारांनी ठेवले डोंगरात पुरून ; टॉवरच्या तारांची चोरी करताना पडून झाला मृत्यू

हॉटेलने आत्तापर्यंत अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले असून त्या ठिकाणी असलेल्या डिस्को थेक मुळे आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला आहे असं नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित हॉटेल वर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे याचा देखील उल्लेख आहे.

pune hotel
Pune Hit And Run: किती ही क्रूरता! लोक ओरडत होते, तरी तो फरफटत नेतच होता, अंगावर काटा आणणारा Video

"त्या" हॉटेल आस्थापनेने वेळोवेळी नियम व कायदे, अटी व शर्थीचा भंग केला आहे असं नोटीसमधये नमूद केलं आहे.पुढे याच पत्रात पोलिसांनी थेट सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. "सदर ठिकाणी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नसून एखादी आपत्कालीन घटना झाल्यास कोणत्याही प्रकारची पर्यायी प्रभावी सुरक्षा यंत्रणा नाही" असं देखील म्हटलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.