Pune : महाश्रमदान दिनी राबवला " स्वच्छतेचा कांदलगाव पॅटर्न "

साऊ-जिजाऊंच्या लेकींनी हा दिन रांगोळ्या काढून साजरा केला.
pune
punesakal
Updated on

इंदापूर : महाश्रमदानदिनाचे औचित्य साधून दि. १६ सप्टेंबर रोजी कांदलगाव ( ता. इंदापूर ) येथील साऊ-जिजाऊंच्या लेकींनी प्रत्येकदारात रांगोळी काढून तालुक्याला " स्वच्छतेचा कांदलगाव पॅटर्न " दाखवून दिला. यावेळी गावातील घरातील प्रत्येक महिलांनी स्वच्छते तून ग्रामसमृद्धी हा केंद्रबिंदू मानून श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले. यावेळी गावात ५ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणीचा शुभारंभ सरपंच रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन विस्तार अधिकारी कबीर कदम आणि सरपंच रविंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गावातून महाश्रमदानफेरी काढण्यात आली. यामध्ये सरपंच रविंद्र पाटील, उप सरपंच तेजमाला बाबर,किसन सरडे,विजय सोनवणे,उल्हास पाटील,बाळू गिरी,कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव,रेखा बाबर,दशरथ बाबर,तंटामुक्ती अध्यक्ष गणेश बाबर, ग्राम सेविका स्वाती चव्हाण,गाव समन्वयक निलोफर पठाण,ग्रामसंघ अध्यक्षा लक्ष्मी कसबे,शिक्षक स्टाफ,अंगणवाडी सेविका,बचतगटातील सदस्या यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी सरपंच पाटील म्हणाले, गावामध्ये महिला बचतगट चळवळ सक्षमपणे कार्यरत असून गटातील प्रत्येक सदस्य महिलेस बायो गॅस प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे सामान्य गृहिणीचे बजेट सावरण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर गावात स्वच्छता राखली जाऊन खत व इंधननिर्मिती होणार आहे, असा तिहेरी फायदा होणार आहे. गावातील जास्तीतजास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच पाटील यांनी केले.

pune
मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?

यावेळी विस्तार अधिकारी कबीर कदम म्हणाले ,कांदलगाव ग्रामपंचायत स्मार्ट असून विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. संपूर्ण गावाने बायोगॅस निर्मिती करणारे गाव म्हणून नावलौकिक मिळवावा असे आवाहन त्यांनी केले.

कांदलगाव १००% बायोगॅसयुक्त करण्यासाठी सर्व महिलांची मदत घेणार असल्याचे मत उपसरपंच तेजमाला बाबर यांनी व्यक्त केले.प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी तर आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.