Pune : कात्रजच्या संस्कृती आर्ट्स ग्रुपचा हिमाचल प्रदेशात डंका

भरतनाट्यम स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम तर मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक
Pune
Pune sakal
Updated on

Pune - भारती विद्यापीठ परिसरातील संस्कृती आर्ट्स ग्रुपच्या विद्यार्थीनींनी फिलफाॅट फोरम आयोजित 'अभिनय 2023' या हिमाचल प्रदेशातील सोलन येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील भरतनाट्यम स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक आणि मोनिष्का बत्तुला आणि गौरी भोसले यांनी युगल नृत्याचे सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.

Pune
Mumbai News : 'मरे'वर महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना; ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

कै. अभिजित पतंगराव कदम बहुउद्देशिय क्रीडा संकुलातील या विद्यार्थींनींनी कात्रजचे नाव या माध्यमांतून शास्त्रीय नृत्य भरत नाट्यम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून याठिकाणी भरतनाट्यमचा सराव करण्यात येतो.

Pune
Pune News : पोहण्यासाठी गेलेला तरुण खडकवासला कालव्यात बुडाला; महिन्याभरात तिसरी घटना घडल्याने खळबळ

मागील अनेक वर्षांपासून याठिकाणच्या कलाकारांनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे. मात्र, आता याच कलाकारांनी हिमाचल प्रदेशात उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे, समीर साबळे यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Pune
Mumbai News : 'मरे'वर महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना; ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

लहान गटात आर्या कुंभार, इरा पागे, अंकिता कुलकर्णी, कोमल लिंगायत, सांची धाडिवाल, अनघा खांडे, स्नेहा मेधने, सृष्टी मेधने व स्वरा मोरे यांचा समावेश होता. तर, मोठ्या गटात गौरी भोसले, मोनिष्का बत्तुला, सलोनी पारिख, कैवल्या बडदे, तेजस्वी शहा, समृद्धी शहा यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.