Pune News: पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कार्यालयात पंख्याला...

बराटे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही
Pune News
Pune NewsEsakal
Updated on

पुण्यातील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल्याची माहीती समोर आली आहे. वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बराटे यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बराटे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. (Latest Marathi Political News)

संजय बराटे यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते. हवेली तालुक्याचे भाजपचे (BJP) १९९५ दरम्यान सरचिटणीस होते.

Pune News
Ajit Pawar: 'भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद', केंद्रीय मंत्र्याचा अजित पवारांना टोला

त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारण सक्रिय राहिले नाही. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते. (Pune Political News)

वारजे एनडीए रस्त्यावर ते राहत असलेल्या इमारतीमध्ये त्यांचे कार्यालय होते. त्या कार्यालायत शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या पत्नीस ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Pune News
Ajit Pawar: बैलासमोर नाचल्याच्या व्हिडिओवर अजित पवार म्हणतात, "गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.