Pune : खडकवासला - फुरसुंगी कालवा भुमिगत करण्याच्या हालचालींना वेग; विविध देशांच्या प्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाकडून पाहणी

खडकवासला धरणातून सद्यस्थितीत असलेल्या कालव्यातून पूर्व हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांतील गावांसाठी पाणी जाताना मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते.
pune
punesakal
Updated on

किरकटवाडी - अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान कालवा भुमिगत करण्याच्या हालचालींना वेग आलेला दिसत असून आज विविध देशांतील तज्ञ प्रतिनिधी व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कालवा मार्ग व खडकवासला धरण परिसरात संयुक्त पाहणी केली. सदर प्रकल्पासाठी प्रस्तावित निधी उपलब्ध करून देणार असलेल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

खडकवासला धरणातून सद्यस्थितीत असलेल्या कालव्यातून पूर्व हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांतील गावांसाठी पाणी जाताना मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तसेच हा कालवा पुणे शहरातून जात असल्याने शहरातील कचरा व दुषित पाणी त्यात मिसळते. यावर उपाय म्हणून खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान सुमारे 28 किलोमीटर लांब कालवा भुमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

शासनाने निविदा मागवून प्रकल्पाचे सर्व्हेक्षण व माती आणि खडकाचे परिक्षण करुन घेतलेले आहे. त्यानुसार आज फिलिपाईन्स, न्युझीलंड, जर्मनी व ऑस्ट्रिया या देशांतील पर्यावरण, भूगर्भ,जल व भुयार तज्ञ आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश सावंत, श्वेता कुऱ्हाडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित भुयारी कालवा मार्ग, खडकवासला धरण परिसरात संयुक्त पाहणी केली. यावेळी आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सदर प्रकल्पाबाबत माहिती आहे का अशी विचारणा केली असता अनेक वर्षांपासून चर्चा ऐकतोय असे शेतकरी संजय हगवणे यांनी सांगितले.

pune
Pune Dam : भामा आसखेड मधील विसर्ग अवघ्या १२ तासांत बंद

किती शेतकरी बाधीत होणार?

या प्रकल्पाच्या लांबीत एकूण कीती जागामालक बाधीत होत आहेत असा प्रश्न परदेशी प्रतिनिधींनी विचारला असता त्याचे स्पष्ट उत्तर व आकडेवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. तसेच या भुमिगत कालव्याचा संबंधित बाधीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फायदा होणार आहे का? या प्रश्नाचे उत्तरही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नाही असेच देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.