पुणे : पुण्यातील खराडी येथील खराडी इथं नदीपात्रात तरुणीचा हात-पाय-शीर कापलेल्या अवस्थेतील मृतदेहाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. दोन- तीन दिवसांपूर्वी ही हत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या मिसिंग केसचे रेकॉर्ड तपासले जात आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास चंदननगर पोलीस आणि पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अशा दोन पथकांनी तपास सुरू केला आहे.