Pune News : विजयस्तंभाच्या आराखड्याकडे शासनाचे दुर्लक्ष, समन्वय समिती; कोरेगाव भिमा येथील अभिवादन सोहळा दोन दिवस

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत डंबाळे यांनी विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याच्या आयोजनची माहिती दिली.
pune koregaon bhima
pune koregaon bhima sakal
Updated on

पुणे - कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभासाठी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे आश्वासन राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी दिले होते. मात्र, अद्यापही स्मारकाच्या अनुषंगाने ठोस काम सुरू झाले नाही. न्यायालयीन वाद फक्त दोन ते अडीच एकर जमिनीशी संबंधित आहे. उर्वरित सर्व जागा राज्यशासनाच्या ताब्यात असून, स्मारकांसबंधीच्या पायाभूत विकासाकडे राज्यसकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत डंबाळे यांनी विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याच्या आयोजनची माहिती दिली. डंबाळे म्हणाले, ‘‘आंबेडकरी अनुयायांकडून भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येते.

pune koregaon bhima
Pune Crime : पुण्यातील राजुरी येथे चोरटयांनी ३ घरे फोडली; वृध्द महिलेस मारहाण, दागिने व रोख रक्कम लंपास

अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवस अभिवादन सोहळा पार पडेल. यंदा २० लाखांपेक्षा जास्त अनुयायी येतील, त्या दृष्टीने पायाभूत सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहे.’’ वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, सुरक्षा आदींसाठी राज्य सरकारने २० कोटींची तरतूद करावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.