Pune Crime : हातात कोयता घेऊन टोळीचा फायनान्स कार्यालयात धुडगूस

Pune Latest Crime Marathi news | दौंड शहरातील एका खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयात जाऊन शाखाधिकारी यांच्यावर कोयता उगारून शिवीगाळ करणार्या दोन भावांसह एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
pune koyta gang at private finance office
pune koyta gang at private finance office Sakal
Updated on

दौंड : दौंड शहरातील एका खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयात जाऊन शाखाधिकारी यांच्यावर कोयता उगारून शिवीगाळ करणार्या दोन भावांसह एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये एका ऑनलाइन चक्री जुगार सेंटरचालक आणि एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी या बाबत माहिती दिली. दौंड - गोपाळवाडी रस्त्यालगत येस बॅंक शाखेच्यावर असणार्या श्रीराम फायनान्स कार्यालयात २६ जुलै रोजी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली करणार्या प्रतिनिधीने दूरध्वनीवरून अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा करीत अमित बारवकर व त्याचे नातेवाईक श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात घुसले.

शाखाधिकारी भूषण देवकाते यांनी खात्री करून त्यांना ` आमच्या कार्यालयातील कोणीही शिवीगाळ केलेली नाही, तुम्ही मुख्यालयात चौकशी करा ` , असे उत्तर दिले. त्याचा राग आल्याने संजय भीमराव बारवकर याने हातातील लोखंडी कोयता भूषण देवकाते यांच्यावर उगारून ` तुम्ही ऑफिस उद्या कसे उघडता तेच बघतो, ऑफिस उघडणा-याच्या डोक्यात कोयता घालतो ` अशी धमकी देत शिवीगाळ केली.

शाखाधिकारी यांच्या कक्षात धमकी दिल्यानंतर अमित बारवकर, संजय बारवकर व इतरांनी कक्षाबाहेर येत कार्यालयातील अन्य कर्मचार्यांच्या समोर कोयता उगारून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी भूषण देवकाते यांच्या फिर्यादीनुसार संजय भीमराव बारवकर, राजेंद्र उर्फ राजू भीमराव बारवकर, अमित बारवकर, नागनाथ गोविंद भगत (चौघे रा. दौंड) व इतर तीन, असे एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

संशयित आरोपी राजेंद्र भीमराव बारवकर हा माजी स्वीकृत नगरसेवक असून दौंड तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचा माजी अध्यक्ष आहे. तर संजय बारवकर व नागनाथ भगत याच्याविरूध्द ऑनलाइन चक्री जुगार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.