Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; फुकट भाजी दिली नाही म्हणून...

Pune Crime
Pune Crimeesakal
Updated on

पुणेः पुणे जिल्ह्यामध्ये सध्या कोयता गँगची दहशत पसरल्याचं दिसून येत आहे. किरकोळ कारणावरुन व्यापाऱ्यांना कोयता दाखवून वसुली सुरु असल्याचे प्रकार सुरु आहेत.

पुण्यातील मांजरी भागात काहीजण कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करीत आहेत. राजरोसपणे असे प्रकार घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरातील नागरिकांनी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, मात्र या गँगवर कारवाई होत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

दहशत पसरवणाऱ्या या गँगचा बंदोबस्त करावा, यासाठी मांजरीमधील व्यापारी, नागरिकांनी धडक मोर्चा काढला. सदरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे.

Pune Crime
Pune Autorikshaw Strike: रिक्षा आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर, दंगल नियंत्रक पथक दाखल

फुकट भाजी दिली नाही म्हणूनही गँगमधील लोक भाजी विक्रेत्यांनाही त्रास देत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.