Pune News पुण्यातील या भागात होतेय दुरुस्त-नादुरुस्त गाड्यांचे पार्किंग

पी१-पी२ प्रमाणे याठिकाणी पार्किंग करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली असली तरी एकाच बाजून सर्सास गाड्या पार्किंग केल्या जातात.
car parking
car parkingSakal
Updated on

कात्रज - लेकटाऊन परिसरात रस्त्याच्या कडेला अनेक गाड्यांची सर्सास पार्किंग होत आहे. पी१-पी२ प्रमाणे याठिकाणी पार्किंग करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली असली तरी एकाच बाजून सर्सास गाड्या पार्किंग केल्या जातात. लेकटाऊन सोसायटीतील नागरिकांचे या गाड्यांच्या आडबाजूला गैरप्रकार होत असल्याचे म्हणणे असून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पार्किंगला परवानगी असली तरी अनेक दिवसांपासून याठिकाणी गाड्या तशाच उभ्या आहेत. या गाड्यांच्या खाली कचरा साचलेला असतो. आयुर्मान संपलेल्याही काही गाड्या रस्त्यालगत पडलेल्या दिसून येतात. नादुरुस्त वाहनांकडे वाहनमालक लक्ष देताना दिसत नाहीत. तसेच, महापालिकेकडून या विल्हेवाट लावण्यात येत नाही. त्यामुळे जास्त दिवस पडून असलेल्या आणि नादुरुस्त गाड्यांवर तरी महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक राजीव गंभीर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

नादुरुस्त गाड्यांना नोटीस देऊन देऊन पुढील १५ दिवसांत यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, दुरुस्त गाड्यांवर अतिक्रमण विभागांमार्फत कारवाई करता येत नाही. नियमांचे उल्लंघन करुन गाड्या लावलेल्या असतील तर त्यांच्यावर वाहतूक विभागांमार्फत कारवाई होणे अपेक्षित आहे.

- संजय जाधव, अतिक्रमण निरीक्षक, कोंढवा-येवलेवाडी, क्षेत्रिय कार्यालय

car parking
Dadachi Shala : रस्त्यावरच्या शाळेला मिळालं चार भिंतीचं हक्काचं घर

सदरील ठिकाणी पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच याठिकाणी एकाच बाजूने पदपथ असल्याने दुसऱ्या बाजूस पार्किंग केल्यास उलटपक्षी नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास होईल. तरीही, नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने याचा एक अहवाल तयार करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- प्रशांत कणसे, सहायक पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस ठाणे

car parking
बाहेरगावी जाताना खूप दिवस Car Parking करून ठेवताय, मग ही काळजी घ्यायला विसरू नका

एकाच बाजूला अनेक दिवस गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने त्या गाड्यांच्या खाली कचरा साचतो. त्यामुळे साफसफाई व्यवस्थित होत नाही. तसेच, रात्रीच्यावेळी गाड्यांचा आडोसा घेऊन गैरप्रकार होतात.

- सुद्दिण जयाप्पा, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.