पुणे : देशभरात कोरोना रूग्णांमध्ये (Corona Cases In Pune ) झपाट्याने वाढ होत आहे, दरम्यान, कोरोना रूग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. 'कोरोना मुक्त गाव' असे या स्पर्धेचे नाव असून, पुणे जिल्ह्यासाठी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात 10 जानेवारीपासून सुरू झाली असून 15 मार्चपर्यंत चालणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune ZP CEO Ayush Prasad) यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पर्धेचे स्पष्टीकरण देण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Pune District Launched Covid-Free Village Contest)
पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोविडमुक्त ठेवण्यासाठी, आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामीण भागात चांगले कोविड (Covid 19 Management) व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धा जाहीर केली आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्याला संबंधित ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी दिला जाणार आहे, असे प्रसाद यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाद्वारे सर्व ग्रामपंचायतींवर कोविडचे योग्य व्यवस्थापन आणि जनजागृती करण्यावर आमचे लक्ष असणार आहे.
पुणे विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन गावांना राज्य सरकारकडून विकास निधीच्या दृष्टीने रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रथम क्रमांकासाठी 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 25 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या गावाला 15 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.