Pune latest Update: शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवात ७ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद राहील. तर, शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या कालावधीत ७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता. ६) दिला आहे.