Pune: Monkeypox चा जिवंत व्हायरस सापडला, आता उपचार होणार सोपा

मंकीपॉक्स व्हायरसला रुग्णाच्या नमुन्यातून वेगळे करण्यात आले यश
monkeypox
monkeypox esakal
Updated on

कोरोनानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांना मंकीपॉक्सबाबत मोठे यश मिळाले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या पथकाने बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणू वेगळे केले आहेत.

जिवंत विषाणू काढण्यासाठी वैज्ञानिकांची एक टीम तयार करण्यात आली होती, जी 14 जुलैपासून व्हायरस शोधण्यासाठी प्रयोगशाळेत रात्रंदिवस काम करत होती. 11 दिवसांनंतर, एनआयव्हीने अधिकृतपणे घोषणा केली आणि सांगितले की टीमला रुग्णाच्या नमुन्यातून मंकीपॉक्स विषाणू वेगळे करण्यात यश आले आहे. याचा अर्थ आता या विषाणूच्या मदतीने शास्त्रज्ञ लवकरच संसर्ग ओळखण्यासाठी चाचणी किट शोधण्यात सक्षम होतील.यासोबतच सीरियन उंदरांमध्ये जिवंत विषाणूचा वापर करून त्याची तीव्रता आणि उपचारांबाबत महत्त्वाची माहिती काढता येणार आहे. याशिवाय मंकीपॉक्सविरोधी लसही शोधली जाऊ शकते.

भारताचे मोठे यश

शास्त्रज्ञांनी ही भारताची ऐतिहासिक कामगिरी असल्याचे म्हटले आहे. हे मोठे यश असल्याचे एनआयव्हीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.प्रज्ञा यादव यांनी सांगितले. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली, त्या काळात आम्ही प्रथम कोरोना विषाणूला वेगळे केले. त्यानंतर चाचणी किट तयार करण्यात आली आणि कोवॅक्सिन लस देखील शोधण्यात आली. यावेळी मंकीपॉक्स वेगळे करण्यात आले आहे. त्याची चाचणी किट, उपचार आणि लस इत्यादींबाबत पुढील अभ्यास लवकरच सुरू होईल.

एनआयव्हीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, 'मंकीपॉक्स विषाणू वेगळे केल्यानंतर आता त्याच्या इतर प्रतीही तयार केल्या जात आहेत. पुण्यातील बीएसएल-3 स्तरावरील प्रयोगशाळेत हे काम सुरू आहे. यातील प्रत्येक विषाणू वेगळ्या अभ्यासासाठी सुपूर्द केला जाईल.

monkeypox
केंद्र सरकारकडून मंकीपॉक्स संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

लस, चाचणी किट बनवण्यासाठी काढली निविदा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) चाचणी किट आणि लस तयार करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी उशिरा निविदा जारी केली. ICMR च्या म्हणण्यानुसार, खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ते लवकरच अँटी मंकीपॉक्स लस आणि त्याची चाचणी किट तयार करतील. ICMR ला प्रत्येक चाचणी किट किंवा लसीच्या डोसवरही रॉयल्टी मिळेल. सध्या, कोवॅक्सिन लसीवर पाच टक्के रॉयल्टी मिळते. मंकीपॉक्सवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच ते ओळखण्यासाठी कोणतेही चाचणी किटही उपलब्ध नाही.

monkeypox
फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचा कहर, 1700 रुग्ण आढळले

संकट अनेक महिने टिकू शकते

अनेक देशांमध्ये पसरलेल्या मंकीपॉक्सपासून त्वरीत सुटका करणे कठीण आहे. या संसर्गाचे संकट अनेक महिने टिकू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या प्रकरणे १५ दिवसांनी दुप्पट होत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्याला त्याच्या प्रतिबंधाकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

परिस्थिती चिंताजनक होऊ शकते

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रोफेसर ऐनी रिमोइन म्हणाल्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभीर्याने न घेतल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते.

monkeypox
Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा आलेख वाढता, केरळमध्ये तिसऱ्या रुग्णाची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.