Pune Bypoll Election: पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार का? कायदेतज्ज्ञ काय सांगतात

बापट यांच्या निधनानंतर पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होऊ शकेल का?
pune lok sabha bypoll election after Girish Bapat Death
pune lok sabha bypoll election after Girish Bapat Death
Updated on

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज निधन झाले. वयाच्या ७२ व्य वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होऊ शकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. (pune lok sabha bypoll election after Girish Bapat Death )

गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजता वैंकुठ स्मशानभुमीत गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

pune lok sabha bypoll election after Girish Bapat Death
Girish Bapat Death : "महिन्याभरापूर्वी गप्पा मारायला ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले होते"

दरम्यान, लोकसभा पोटनिवडणुक लागण्याच्या चर्चेवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते. 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा पोटनिवडणुक होऊ शकते.

कायदेतज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?

१९५१ सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक २०२४ मे एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागेल आणि ही निवडणुक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागते. असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.

pune lok sabha bypoll election after Girish Bapat Death
MP Girish Bapat Passes Away: गिरीश बापटांचा पराभव करायला थेट राहुल गांधी पुण्यात आले होते

विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेचीही निवडणुक होईल. दोन्ही नियमात कोणताही फरक नाही. असही बापट म्हणाले. लोकसभा निवडणूक एप्रिल, मे २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे.

बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा सून स्वरदा केळकर लढवणार ?

बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा सून स्वरदा केळकर लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय काकडे, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहळ यांची नावं राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()