Lok Sabha Election Result : भिस्त असलेल्या मतदारसंघाने पुन्हा दिली साथ; मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात उचलला मोलाचा वाटा

Pune Lok Sabha Election Result 2024 : भाजपला चांगले मताधिक्य मिळण्याची अपेक्षा असलेला पर्वती हा एक मतदारसंघ. त्यामुळेच या मतदारसंघावर भाजपची भिस्त होती.
Pune Lok Sabha 2024
Pune Lok Sabha 2024Esakal
Updated on

भाजपला चांगले मताधिक्य मिळण्याची अपेक्षा असलेला पर्वती हा एक मतदारसंघ. त्यामुळेच या मतदारसंघावर भाजपची भिस्त होती. त्यानुसार या मतदारसंघाने सुमारे २९ हजारांचे मताधिक्य दिले आणि मुरलीधर मोहोळ यांचा विजय सुकर झाला. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघाने तेव्हाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना तब्बल ६६ हजार ३३२ मतांचे मताधिक्य दिले होते. तर, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार माधुरी मिसाळ यांना ३६ हजार ७२८ मतांची आघाडी मिळाली होती.

या मतदारसंघात महापालिकेचे आठ प्रभाग आहेत. त्यातील दोन प्रभागांतील निम्माच परिसर या मतदारसंघात येतो. त्यातील पर्वती मतदारसंघात २७ नगरसेवक येतात. त्यापैकी २० नगरसेवक भाजपचे होते. त्याशिवाय दोन स्वीकृत नगरसेवकही भाजपचेच होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ भाजपला मिळाली. मतदारसंघात ४० टक्क्यांहून अधिक भाग झोपडपट्टी आणि वस्ती स्वरूपाचा आहे. तसेच गृहरचना सोसायट्यांचे जाळेही मोठे आहे. दत्तवाडी, सानेगुरूजीनगर, महर्षीनगर, बिबवेवाडी, अप्पर, इंदिरानगर, जनता वसाहत आदी पूरग्रस्त वसाहतीही येथे आहेत.

त्यात महापालिकेच्या वसाहतींचाही समावेश आहे. तसेच दांडेकर पूल, जनता वसाहत, डायस प्लॉट, पानमळा आदी झोपडपट्टी भागांतही मतदारांची संख्या मोठी आहे. सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर इंदिरानगर परिसरात सहकारी गृहरचना संस्थांची संख्या मोठी आहे. मराठा, ओबीसी मतदारांबरोबच जैन, माहेश्‍वरी, मुस्लीम, ख्रिश्‍चन आदी धर्मियांचेही येथे प्राबल्य आहे. शिवाय मागासवर्गीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांची तिसरी टर्म आहे.

Pune Lok Sabha 2024
Maharashtra Lok Sabha election result 2024 : मराठवाड्याचा किंगमेकर कोण? शरद पवार की मनोज जरांगे? महाराष्ट्राचा निकाल बदलवणारे 'ते' चार शब्द...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ५५.४७ टक्के म्हणजे १ लाख ८९ हजार १८४ मतदारांनी मतदान केले. त्यात मोहोळ यांना १ लाख ३ हजार ५४२ तर, धंगेकर यांना ७४ हजार ५४५ मते मिळाली. गृहरचना संस्थांतून मोहोळ यांना चांगले मतदान झाले. तर, दांडेकर पूल, पानमळा, अप्पर इंदिरानगर, दत्तवाडी, नवी पेठ जनता वसाहत, तळजाई, डायस प्लॉट आदी भागांतून धंगेकर यांना चांगले मतदान झाले.

खडकमाळ आळी, स्वारगेट पोलिस लाइन आदी भाग पर्वती मतदारसंघात येतो. तेथे धंगेकर यांना ३८४ मतांचे मताधिक्य मिळाले. तर, सॅलिसबरी पार्क परिसरातून (प्रभाग क्र. २८) मोहोळ यांना सुमारे ८ हजारांचे, सिंहगड रस्ता परिसरातून (प्रभाग ३४) ६ हजार ८३२, सहकारनगर परिसरातून (प्रभाग ३५) ६ हजार ११७ , बिबवेवाडी परिसरातून (प्रभाग ३६) ५ हजार ३६७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. मात्र, नवी पेठ (प्रभाग २९) येथून १८०७, दत्तवाडीमधून (प्रभाग ३०) १२७० आणि अप्पर इंदिरानगरमधून (प्रभाग ३७) केवळ १३३ मतांचे मताधिक्य मोहोळ यांना मिळाले. दत्तवाडी, नवी पेठ प्रभागाचा काही भाग कसबा मतदारसंघातही येते. तेथील पोटनिवडणुकीच्या वेळीही या भागावर भाजपचे लक्ष होते. परंतु, अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते.

Pune Lok Sabha 2024
Dhule Lok Sabha Election 2024 Result : बागलाण विधानसभेतील कांदाप्रश्नाची धग, अडंरकरंट न जाणणे ठरले घातक!

मतदारसंघातील प्रमुख समस्या

मार्केटयार्ड परिसरात वाहतुकीची कोंडी

जड वाहनांची दिवसाही होणारी वाहतूक

सातारा रस्त्यावरील बीआरटीची दुरवस्था

ससूनच्या धर्तीवर सार्वजनिक रुग्णालयाची कमतरता

पावसाळी वाहिन्यांची दुरवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.