Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १२ हजार ६०० मशिन उपलब्ध

पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च २०२३ रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे.
EVM-machine
EVM-machinesakal
Updated on

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत उत्सुकता वाढू लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली नसली, तरी आयोगाकडून मात्र बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण १२ हजार ६०० मशिन जिल्हा प्रशासनाकडे दिल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या मशिनची प्राथमिक तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.

पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च २०२३ रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे.

EVM-machine
Pune News : लिंग गुणोत्तरात पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसला तरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ईव्हीएम मशिन केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे. या मशिन नविन आहेत. यामध्ये बॅलेट युनिट चार हजार २००, कंट्रोल युनिट चार हजार २०० आणि व्हीव्हीपॅट चार हजार २०० अशा मशिन प्राप्त झाल्या आहे.

कोरेगाव पार्क येथील खाद्य गोदामामध्ये या मशिनची प्राथमिक तपासणी सुरू आहे. पुढील दोन दिवसात ही तपासणी पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये मशिन वापरण्यायोग्य आहे का, याची तपासणी केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मशिनची फस्ट लेव्हल तपासणी केली जाणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली तपासणी सुरु असून तलाठी, मंडल अधिकारी, महसुल विभागातील कारकून हे तपासणीचे काम करत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

EVM-machine
Hording : पुणे शहरासह ग्रामीण भागातही होर्डिंग मृत्यूचे सापळे

दरम्यान, पुणे लोकसभा विधानसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे १९ लाख ७२ हजार इतकी आहे. तर मतदानकेंद्रांची सुमारे दोन हजार इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.