Pune : लोणीत रंगला कलगीतुर्याचा सामना २८ वर्षाची परंपरा

नागपंचमी निमित्त कलगीतुर्याच्या लोककलेची परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु
pune
punesakal
Updated on

पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे नागपंचमी सणानिमित्त गेली 28 वर्षापासुन चालत आलेल्या परंपरेनुसार शाहीर रामदास गुंड व शाहीर नानासाहेब साळुंखे यांच्या रंगलेल्या कलगीतुर्याच्या सवाल जवाबाचा सामणा पाहण्यासाठी आंबेगाव, शिरुर, खेड, जुन्नर व पारनेर तालुक्यातील सुमारे 10 गावांतील हजारो श्रोते सकाळी नऊ वाजल्यापासुन सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाण मांडुण बसले होते.

येथे नागपंचमी निमित्त कलगीतुर्याच्या लोककलेची परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु असुन आज मंगळवारी येथील बाजार तळावरील श्री.छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी 9 वाजल्यापासुन शाहीर रामदास गुंड आणि मंडळी ( तुर्यावाले) व शाहीर नानासाहेब साळुंखे आणि मंडळी ( कलगीवाले) यांचा कलगीतुर्याच्या सामन्याला सुरवात झाली

पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसनराव गायकवाड, शिवसेना संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच उध्दवराव लंके, बाळासाहेब गायकवाड, पिंटू पडवळ, प्रकाश वाळुंज, हैबतराव आढाव, अमीत वाळुंज, बाळासाहेब आदक, संदीप पाटील आढाव व ग्रामस्थांनी केले.

यावेळी शाहीरांनी गण गवळण, सवाल - जवाब या प्रकाराने ही कला सादर केली. यावेळी पथकातील कलाकारांनी रामायण, महाभारत, पौराणिक कथा अशा विविध कथावर कलगीवाले व तुरेवाले यांचा सवाल जवाब रंगला होता. सुत्रसंचालन उध्दवराव लंके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.