Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

Baner: पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठवून डेंग्यू सारखे आजार बळावत आहेत. अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण ही झालेली आहे.
Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
Updated on

Balevadi: गेल्या अनेक महिन्यापासून बाणेर - बालेवाडीकरांना वाहतूक कोंडीमुळे घरातून बाहेर पडायचीच भिती वाटते आहे.सततच्या पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, जागोजागी कचऱ्याचे ढीग , खचलेले चेंबर , फुटपाथची दुरवस्था, सांडपाणी वाहिनी चेंबर फुटून रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी हे टाळण्यासाठी घरात थांबूनच काम करावे असे म्हटल तर, सतत सुरू असलेला विजेचा लपंडाव. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती या भागात राहणाऱ्या नागरिकांची झालेली आहे .

त्यात भर म्हणजे डेंग्यू ने ही या भागात थैमान घातले आहे . त्यामुळे आमच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी प्रश्न सोडिण्याची नागरिकांची मागणी . बाणेर बालेवाडी हे पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार म्हटले जाते. बाणेर महाळुंगे रस्ता हा तर व्हीआयपी रस्ता म्हणून परिचित आहे. सध्या येथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत .

Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

या रस्त्याने येणे जाणे मुश्कील होऊन बसले आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यातून ये-जा करताना नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. रस्त्यावर जड वाहने ये-जा करून रस्त्यावरची खडी निघून यावरून नागरिक घसरून पडत आहेत .

बालेवाडी येथे एसकेपी कॅम्पस समोरील रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण पाणी आहे .त्यामुळे या रस्त्याची एकच बाजू वापरली जाते. जवळच तीन शाळा असल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास तात्पुरते काम केले जाते.

तर पीएमआरडीए अधिकारी आणि मेट्रोच्या अधिकारी यांना रस्त्याशी, खड्यांशी घेणे देणे नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे, आणि या सगळ्यात या भागातील नागरिक भरडला जातो आहे. वाहतूक कोंडी साठी घरातून काम करावे तर सतत वीज पुरवठा खंडित होतो.

त्यामुळे काय करावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे? घरातून बाहेर पडल्यास जागोजागी कचऱ्याचे ढीग, खचलेले चेंबर, पदपथाचची झालेली दुरवस्था ,सेवा रस्त्यांची ही अशीच परिस्थिती. सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठवून डेंग्यू सारखे आजार बळावत आहेत. अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण ही झालेली आहे.

Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

यासंदर्भात वेळोवेळी सकाळ वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही .याची दखल कोणीही घ्यायला तयार नाही . तरी प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

सतत पाऊस पडतो आहे त्यामुळे खड्ड्यांमध्ये कोल्डमिक्स बॅग आणि खडी टाकून खड्डे बुजवत आहोत .उघडीप मिळाल्यास डांबर टाकून काम करण्यात येईल.

मकरंद वाडेकर

Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
Pune Traffic : पुण्यातील ३२ रस्त्यांवरील कोंडीवर ‘मार्ग’ ; अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील, ‘वाहतूक सुधारणा प्रकल्पा’चे सादरीकरण

उपअभियंता पथ विभाग महापालिका . कचऱ्या संदर्भात यंत्रणा कामास लागली असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल. डेंग्यू साठी ज्यांना पाहिजे त्यांना आरोग्य खात्याकडून फवारणी ही केली जाते आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा , तक्रारीचे निराकरण ताबडतोब केले जाईल.

गिरीश दापकेकर, औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त

पी एम आर डी ए मुख्य अभियंता रिनाज पठाण यांची तब्येत बरी नसल्यामुळे बोलणे होऊ शकले नाही. इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .या भागात सगळीकडे रस्त्यांची चाळण झाली आहे.महापालिका व मेट्रो कडून जिथे रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातात त्या कामाचा दर्जा खूपच निकृष्ट असतो. काही दिवसातच पुन्हा याच ठिकाणी खड्डे पडतात.

मृदुला चिमुरकर, बाणेर

Pune: दाद मागायची तरी कोणाकडे? बाणेर बालेवाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
Pune Municipal : महापालिकेने पीएमआरडीला केला पावणे चौदा लाखाचा दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.