Pune News: हुतात्म्यांना रक्तदान समर्पित; अंनिसच्या शिबिरात ८९ जणांचे रक्तदान

Blood Donation Camp: भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींचे स्मरण करत ८९ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला दोनशे नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.
Blood Donation Camp
Blood Donation CampSakal
Updated on

पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींचे स्मरण करत ८९ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला दोनशे नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. रक्तदात्यांनी डॉ. दाभोलकर आणि स्वातंत्र्यसेनानींच्या हुतात्म्यांना रक्तदान समर्पित केले.

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे अध्वर्यू शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या बलिदान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

Blood Donation Camp
Blood Donation CampSakal
Blood Donation Camp
Pune News : ‘डीएसके’चे ठेवीदार आंदोलनाच्या पावित्र्यात

यावेळी अंकुश काकडे, मानव कांबळे, सुभाष वारे, सुनील महाजन, अंजली ढमाळ, मनीषा गंपले, शरद अष्टेकर, प्रकाश पवार, अमरनाथ सिंग आदी मान्यवरांसह २०० जण उपस्थित होते. शिबिराचे यंदा चौथे वर्षे होते. चार वर्षात यंदा सर्वाधिक रक्तदान झाले, अशी माहिती शाखेचे कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले यांनी दिली.

Blood Donation Camp
Blood Donation CampSakal

स्वातंत्र्य सेनानींचे स्वातंत्र्यांसाठी हौतात्म्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कामासाठी डॉ. दाभोलकरांचे बलिदान याच्यांशी रक्तदानाचे अतूट नाते आहे. रक्तपात करून कुणाचे प्राण घेण्यापेक्षा रक्त देऊन नागरिकांचे प्राण वाचविणे, हा मानवतावाद आहे. अहिंसा, मानवतावाद रुजविण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Blood Donation Camp
Blood Donation CampSakal
Blood Donation Camp
Pune Long Weekend Gateways: पुणेकरांनो लॉन्ग विकेंडसाठी बेस्ट आहेत तुमच्या जवळची खास ठिकाणे, कसं जायचं मित्रांना पण सांगा

रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि प्रबोधनकार ठाकरे यांची 'दगलबाज शिवाजी', 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' ही पुस्तके भेट दिली. शिबिराच्या संयोजनात रतन नामपल्ले, विजय गायकवाड, विनोद खरटमोल, रोहित घोगरे, माधुरी गायकवाड, नम्रता ओव्हाळ, वैशाली कळसाईत, गोविंद बोंबीलवाड, एकनाथ पाठक, सतीश जाधव, मयूर पटारे आदी कार्यकर्ते सक्रिय सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.