सासवड : महामानवांच्या योगदानातून महाराष्ट्र घडला. त्यात महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव महाराष्ट्रात नव्हे.. तर देशभरात त्यांच्या विचारातून पोचले. फुले यांचा दृष्टीकोन दिडशे वर्षापूर्वीही ठोस समाज परिवर्तनाचा होता.
त्यातून कर्मकांड, थोतांड, धार्मिक अंधश्रध्दा यावर प्रहार करीत जुन्या चालीरिती बदलण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापला. एवढेच नाही, तर बांधकाम व्यावसायात त्यांनी इंजिनीअरप्रमाणे कामे केली. तसेच समाज बांधनी करतानाही शेतकऱयाने शेतीबोरबरच जोडधंदा करण्याचा ठोस उपाय समाजाला दिला., असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
सासवड (ता.पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आज (ता.5) सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (150 वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, प्रमुख वक्ते म्हणून म.फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ.बाबा आढाव, अभ्यासक प्रा.हरी नरके,
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा.प्रकाश पवार, स्वागताध्यक्ष माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, निमंत्रक रावसाहेब पवार आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ.बाबा आढाव यांना स्व. सदाशिव झेंडे ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले.
श्री. पवार पुढे म्हणाले., महात्मा फुले यांनी इंग्लंडच्या राजालाही मुंबईत भेटून शेतकऱयांसाठी त्याकाळी दुष्काळात निवेदन दिले होते. रोजगारार्थ दुष्काळी कामात ग्रामीण माणसांना खडी फोडण्याचे काम देण्यापेक्षा तलाव, बंधारे बांधण्याचे काम द्या. भुजल वाढेल व जलसंचय वाढून शेतीला भविष्यात पाणी मिळेल, हा त्यांचा दृष्टीकोन त्यावेळी होता.
यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या., देशात विवाह व्यवस्थापन व्यावसाय चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे विवाहाच्या नावाखाली किती उधळपट्टी होते, हे लक्षात घेऊन विवाह साधेपणाने केले., तर फुलेंचे विचार आचारणात आणल्यासारखे होईल.
सत्यशोधक समाज विचार आम्हा पवार कुटुंबियांत पहील्यापासूनच आहे. प्रा. नरके म्हणाले., भेदाभेदमुक्त मानव हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद होते. सत्ता विक्रेंदीकरण, जाती निर्मुलन, ज्ञान व ज्ञान निर्मिती, शिक्षण, समता, राजकीय परिवर्तन हा उद्देश व विचार फुलेंनी दिला. आजचे फुलेंचे रुप म्हणजे बाबा आढाव आणि शाहू महाराजांचे रुप म्हणजे शरद पवार आहेत. यावेळी बाबा आढावा, आमदार संजय जगताप, प्रा. प्रकाश पवार यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब पवार यांनी केले, तर स्वागत संभाजी झेंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.जितेंद्र देवकर यांनी व आभार प्रदर्शन प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले
``देशभरातील आताची परिस्थिती पाहता, दिडशे वर्षानंतरही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज समाजाला आहे, असे वाटते. त्यातूनच लोकशाही व माणुसकी टिकेल. स्त्री - पुरुष समानता येईल व हा विचार भक्कम होईल. त्याची सुरवात आजच्या सत्यशोधक समाज परिषदेच्या निमित्ताने फुले यांच्या जन्मभूमीतून झाली. ही चळवळ पुढे अधिक व्यापक व्हावी., असे यानिमित्ताने वाटते.``
- संजय जगताप, आमदार पुरंदर-हवेली
``सत्यशोधक समाज चळवळीने त्यावेळी लोकशाही, समता, बंधुता, सुधारणा, प्रगती आदी भूमिका मांडली. तरीही अजूनही घरात मुलगा व मुलगी यांच्यात समानता पाळली जात नाही. दोघांना समान न्याय देता येईल, त्यावेळी तुम्ही सत्यशोधक चळवळ मानली, असे म्हणता येईल. विवाहाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान झाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नुसत्या मोदी किंवा पवार यांच्या भाषणाने समानता येणार नाही. प्रत्यक्ष कृती हवी. घरपे तिरंगा आणि घरमें संविधान हवे. तरच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाच्या घटनेतला भारत निर्माण होईल.``
- डाॅ.बाबा आढाव
सासवड (ता.पुरंदर)ःयेथे सत्यशोधक समाज परिषदेत डाॅ. बाबा आढावा यांना जीवनगौरव पुरस्कार देताना शरद पवार., त्यावेळी उजवीकडून संभाजी झेंडे, आ.संजय जगताप, हरी नरके, पवार, आढाव, रावसाहेब पवार, सुप्रिया सुळे, शुभांगी गावडे आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.