Latest Pune News: डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया तर्फे माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्यास सन २०२४ चा "बेस्ट शुगर फॅक्टरी " हा पुरस्कार शनिवार (ता.२४) रोजी पुण्यात प्रदान करण्यात आला. माळेगाव साखर कारखान्याने नेहमीच उच्चांकी गाळप केले.
शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी दर दिला आणि संस्थाही अर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवली. यात प्रशासन व संचालक मंडळाचे योगदान महत्वपुर्ण ठरले आहे. त्यामुळेच राज्यात सहकारी साखर कारखानदारीमध्ये माळेगाव अव्वल स्थानावर आला व वरील पुरस्काराचा मानकरी ठरला, असे गौरोद्धागर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (एनएफसीएफएस) अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) ६९ वे वार्षिक अधिवेश शनिवारी पुण्यात संपन्न झाले. त्या कार्य़क्रमात माळेगाव साखर कारखाना प्रशासनाला "बेस्ट शुगर फॅक्टरी " हा पुरस्कार हर्षवधन पाटील यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काराखान्याचे अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजनकुमार तावरे, योगेश जगताप, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, सौ.संगिता कोकरे, सौ. अलका पोंदकुले, मगेश जगताप, नितीन जगताप, भिमदेव आटोळे, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे, चिफ केमिस्ट विकास फडतरे, डिस्टीलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माळेगावचे अध्यक्ष अॅड.जगताप म्हणाले,`` शेती आणि शेती पुरक व्यवसायाला पुढे घेऊन जाणारा माळेगाव कारखाना शेतकरी विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरला आहे. साखर उद्योगामध्ये माळेगाव कारखान्याने इतरांना दिशा देण्याचे काम केले. सहकारी चळवळीच्या माध्यमातुन समाज परिवर्तन करण्याचे हेतुने माळेगावने साखर निर्मितीबरोबर उपपदार्थ निर्मीतीवर लक्ष केंद्रीत केले. परिणामी उच्चांकी ऊस गाळप केले. शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी दर मिळाला आणि संस्थाही अर्थिक दृष्ट्या सक्षम राहिली. या यशस्वी वाटचालीमध्ये संचालक मंडळ, अधिकारी व कामगारांचा मोलाचा वाटा आहे.``
.......
माळेगाव कारखाना प्रशासनाला दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया या संस्थेने पुरस्कार देवून सन्मानित केले. परिणामी सभासद, कामगारांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यापुढील काळात एकरी ऊस उत्पादता वाढविणे, तांत्रिक गुणवत्ता मिळविणे, वित्तीय व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे, अधिकाधिक साखर उतारा मिळविणे, साखर विक्रीमध्ये पारदर्शकता आणून साखरेचे आयात-निर्यातीचे धोरण उत्तमपद्धतीचे राबविणे, असा संकल्प अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी केल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.