पुणे : मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम दिरंगाई सोबत धोक्याचे

उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू; मार्गावरून वाहतूक सध्या बंद
Pune Manjari Budruk road work delay with dangerous
Pune Manjari Budruk road work delay with dangeroussakal
Updated on

मांजरी : येथील मांजरी-वाघोली जिल्हा प्रमुख मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल ते मुळामुठा नदीपर्यंत पीएमआरडीएकडून (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) रस्ता रूंदीकरण व काँक्रीटीकरण केले जात आहे. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणाही केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदी वाघोलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही रेंगाळत सुरू असल्याने या मार्गावरून वाहतूक सध्या बंद आहे. त्याचा फायदा घेत पीएमआरडीएकडून करण्यात येत असलेल्या त्यापुढील रस्त्याचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद असल्याने व पर्यायी मार्ग दूरवरून जात असल्याने अनेक स्थानिक नागरिक व विद्यार्थी फाटकापर्यंत खासगी वाहनाने येऊन पायी रेल्वेरूळ ओलांडून पुढे असणाऱ्या वाहनाने प्रवास करीत असतात. मात्र, पुलापर्यंत येताना मार्गात त्यांना अडथळ्यांची शर्यत पार करीत व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रेल्वेगेट उड्डाणपूलाच्या बाजूने या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम के. के. घुले विद्यालय चौक व पुढे स्मशानभूमी पर्यंत सुरू आहे. मात्र, ठिकठिकाणी काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जुन्या रस्त्याला लागून असलेल्या रस्त्याचा भाग जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे सध्या एकाच बाजूने दोन्ही दिशेकडील वाहतूक सुरू आहे. मांजरी खुर्द व वाघोलीकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर लहान वाहने तसेच शालेय विध्यार्थी व कामगार वाहतूक करणाऱ्या मोठ्या बसची मोठी वर्दळ असते. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदलेला असताना उर्वरित बाजूने दोन्ही दिशांकडील वाहतूक सुरू आहे.दुभाजकांचे खड्डे, सेवा रस्त्यांची दुरवस्था, सूचना फलकांचा अभाव, धोकादायक विद्युत खांब, रहिवाशांच्या साहित्याचा अडथळा यामुळे येथे प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.

त्यामुळे रात्री-अपरात्री या ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे. पीएमआरडीएचे अधिकारी व वाहतूक विभाग कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप शैलेंद्र बेल्हेकर, गजेंद्र मोरे, प्रभाकर शिंदे, अशोक आव्हाळे, संतोष खरात, प्रकाश गावडे यांनी केला आहे.

"रस्ता बांधकाम करताना वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित असावी यासाठी ठेकेदाराने काळजी घेतली पाहिजे. परंतु येथे तसे दिसत नाही. मनमानीने काम केले जात आहे. बाधित रहिवाशांना विश्वासात घेतले पाहिजे. जागा संपादीत करताना दुजाभाव ठेवला आहे. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा न्यायासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.'

- राजेंद्र साळवे अध्यक्ष, अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती.

"रस्त्याचा मोठा भाग वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यांची परवानगी, अतिक्रमण केलेल्या नागरिकांशी बोलून त्यांना जागा सोडायला सांगणे, महावितरणचे विद्युत खांब, ट्रान्स्फार्मरचे स्थलांतर या कामांमुळे रस्त्याच्या कामाला वेळ लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठेकेदाराला सर्वप्रकारची काळजी घेण्यास सांगितले आहे.'

- स्वरूप शिरगुप्पे कनिष्ठ अभियंता, पीएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()