Pune: ‘एमएचटी सीईटी’साठी तब्बल सात लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाईन आर्टस शिक्षणातंर्गत येणाऱ्या जवळपास १६ हून अधिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येतात. यामध्ये ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नावनोंदणी होती.
Student
Studentsakal
Updated on

पुणे- अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेला यंदा विक्रमी नोंदणी झाल्याचे दिसून आले. आतापर्यंत  सात लाख ३९ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर राज्यात जवळपास १६ हुन अधिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या सीईटी परीक्षांसाठी एकूण ११ लाख ८८ हजार १२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Student
Mumbai : बांद्रा नव्हे वांद्रे हवे ! मराठी भाषा प्रेमींची केंद्राकडे तक्रार

तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि फाईन आर्टस शिक्षणातंर्गत येणाऱ्या जवळपास १६ हून अधिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येतात. यामध्ये ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नावनोंदणी होती.

अद्यापही या नाव नोंदणी प्रक्रियेतील तब्बल एक लाख २० हजार १०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. असून अर्ज नोंदणीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. तर पीसीबी ग्रुपमधील दोन लाख ९६ हजार ९९ विद्यार्थ्यांचे, तर पीसीएम ग्रुपमधील तीन लाख २३ हजार ५७४ विद्यार्थ्यांचे अर्ज शुल्क भरून निश्चित झाले आहेत, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

Student
Mumbai : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 चौरस फुटाचे घर द्या रामदास आठवले यांचा निवडणूक अजेंडा

इन्फोबॉक्स

  • विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची झालेली नोंदणी :

  • परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी

  • एमएचटी-सीईटी : ७,३९,७७८

  • एमबीए/एमएमएस : १,५०,७०७

  • एमसीए : ३९,२१९

  • एलएलबी (पाच वर्ष) : २८,२५८

  • एलएलबी (तीन वर्ष) : ८९,२९३

  • बी.पी.एड : ११,२५०

  • बी.एड (जनरल ॲण्ड स्पेशल), बी.एड ईएलसीटी : १,०२,३२६

  • बी.एड-एम.एड : ९,४८३

  • फाइन आर्टस्‌ : ४,५६१

  • बीए बीएस्सी बी.एड  : ४,६३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.