Sinhagad fort news
Sinhagad fort news sakal

Pune : सिंहगडावर अनेक पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही.
Published on

Pune - सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत.

रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. वाहनतळ पूर्ण भरून घाटरस्त्यावर एक किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाडीतळापासून पुणे दरवाजापर्यंत व गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालताना दिसत.

असतानाच टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

 Sinhagad fort news
Pune : शनि महाराजांच्या दर्शनासाठी दहा हजाराहून अधिक भाविकांची गर्दी

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही.

जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

 Sinhagad fort news
Pune: किल्ले राजगडच्या पायथ्याशी आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

"दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते. हॉटेल चालकांनी धूर करुन मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलींपासून धूर लांब असल्याने उपयोग होत नव्हता." अजित निमसे, पर्यटक.

"अचानक मधमाशा दिसल्याने आम्ही पळालो. हजारो पर्यटक गडावर होते. जर मोठ्या प्रमाणात मधमाशांनी हल्ला केला तर लोक पळणार तरी कोठे? संबंधितांनी याबाबत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे."

ईश्वर खरात, पर्यटक.

 Sinhagad fort news
Mumbai : पीओपी गणेशमुर्ती बंदीला भाजपचा विरोध

"सकाळी काही तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्यानंतर त्या परिसरात कोणी जाऊ नये म्हणून कर्मचारी तैनात केले होते. असे असताना पुन्हा त्या परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. तोफेचा पॉईंट परिसरात कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत."

बाळासाहेब जिवडे, वनरक्षक,सिंहगड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.