Pune Market Committee : पुणे बाजार समिती : मार्केट यार्डात शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास

बाजार समितीच्या फळे-भाजीपाला विभागातील शेतमालाच्या चोऱ्या काही केल्याने कमी होत नाहीत. चोऱ्यांमुळे शेतकरी, अडते वैतागले गेले आहेत. बाजारात काम करणाऱ्या दोघांनीच चोरी केल्याचा व्हिडीओ व्हारायल झाल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Market Committee
Pune Market Committee Sakal
Updated on

मार्केट यार्ड : बाजार समितीच्या फळे-भाजीपाला विभागातील शेतमालाच्या चोऱ्या काही केल्याने कमी होत नाहीत. चोऱ्यांमुळे शेतकरी, अडते वैतागले गेले आहेत. बाजारात काम करणाऱ्या दोघांनीच चोरी केल्याचा व्हिडीओ व्हारायल झाल्याने खळबळ उडाली आहे.

बाजार आवारातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शेतमालाच्या चोरीच्या घटना सर्रास घडत असून आहेत. बाजारात सातत्याने चोऱ्या होत आहेत. ठरवून दिलेल्या संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने चोरांचे चांगलेच फावते असल्याचे म्हणणे अडत्यांचे आहे.

जाधव जगताप कंपनी तरकारी विभाग गाळा नंबर 337 यांच्या गाळ्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास कांदा विभगात काम करणाऱ्या दोघांनी गाळ्यावरून फळभाज्या झोळीत भरून नेला आहे. शेतकरी शेतमाल वजन करून पाठवतात.

शेतकऱ्यांना वजनाप्रमाणे पट्ट्या करून पैसे द्यावे लागतात. अश्या प्रकारच्या चोऱ्या वारंवार होत आहेत. रोज वजन कमी लागत आहेत. आम्ही अडते सगळे पैसे टाकून पट्ट्या करून देत आहोत. असे प्रकार मार्केटला किती दिवस चालणार आहेत. याच्यावर काहीतरी तोडगा काढावा असे संबंधीत अडत्याचे म्हणणे आहे.

यापूर्वीही व्यापाऱ्यांच्या सोशल मिडियाच्या व्हाट्सग्रुपवर शेतमालाच्या चोरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अद्याप या प्रकाराची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. याबाबत अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, “चोरी करणारा कोणीही असला तरी बाजार समितीने त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.”

बाजारातील कांदा, लसूण, आलं यासह विविध फळभाज्यांचे भाव वाढल्याने त्यांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. बाजार घटक हैराण झाले असून शेतकरी, अडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

संबंधित दोघांची माहिती घेऊन. त्या कामगारांचा परवाना रद्द करण्याचा सूचना विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.