Pune Market Yard : ‘वाहन प्रवेश फी’च्या नावाखाली शेतकरी वाहनचालकांची पुणे बाजार समितीत लूट

पुणे बाजार समितीत ठेकेदारांकडून ‘वाहन प्रवेश फी’च्या नावाखाली शेतकरी वाहनचालकांची लूट सुरू आहे.
Pune Market Yard Loot
Pune Market Yard LootSakal
Updated on

मार्केट यार्ड - पुणे बाजार समितीत ठेकेदारांकडून ‘वाहन प्रवेश फी’च्या नावाखाली शेतकरी वाहनचालकांची लूट सुरू आहे. बाजारातून शेतमालाची रिकामे वाहन बाहेर पडत असताना प्रत्येक वाहनचालकाकडून दहा ते पन्नास रूपयापर्यंत शुल्क घेतले जात आहे. तसेच त्यांना कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे होणारी लूट थांबणार का? असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

गुलटेकडी मार्केटयार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना ‘वाहन प्रवेश फी’ आकारली जात नाही. परंतु भुसार विभागातील गेट नं. ५ मधून बाहेर पडणाऱ्या शेतमालाच्या वाहनांकडून पैसे आकारले जात आहेत. याकडे समितीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संचालक मंडळ आल्यानंतरही शेतकऱ्यांची होणारी लूट काही केल्या थांबत नाही.

तसेच गुळ-भुसार बाजारात खरेदीसाठी येणार्‍या चारचाकी वाहनांना पार्किंग शुल्क आणि वाहन प्रवेश फी असे दोन्ही शुल्क आकारले जाते. बाजारात दररोज सुमारे हजार ते दीड हजार वाहने येतात. प्रतिवाहन दहा रूपयेनुसार रोज दहा ते पंधरा हजार रुपये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे जमा होणारे पैसे नक्की कुठे जातात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भुसार बाजारात ‘वाहन प्रवेश फी’साठी पहिल्या पाच तासांसाठी १० रूपये त्यानंतर पाच तासानंतर प्रतितास दहा रूपये असे शुल्क निश्चित केले असताना बाजारात येणार्‍या वाहनांकडून प्रवेश फीच्या नावाखाली तीस रूपयांपासून काही चालकांकडून अगदी दोनशे रूपये शुल्क घेतले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपुर्वी एका संचालकाने देखील जास्ती पैसे घेतल्याच्या प्रकारावरून संबंधितांना जाब विचारला होता. त्यांनतरही परिस्थिती जैसे थे आहे.

मुख्य प्रवेशव्दारातून पुन्हा शेतमालाची वाहने माघारी जाण्यासाठी गेट सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील.

- डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.