Pune : जिल्ह्यात अवेळी पावसाने;भाजीपाला, फळबागांचे नुकसान

आंबा, द्राक्षे, अंजीर, चिक्कू, कांदा, टोमॅटोला सर्वाधिक फटका
Pune Market Yard : फळभाज्या शंभरी पार; पावसामुळे मोठे नुकसान
Pune Market Yard : फळभाज्या शंभरी पार; पावसामुळे मोठे नुकसानsakal media
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यात अवेळी झालेल्या वादळी पावसामुळे भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा आंबा, द्राक्षे, अंजीर, चिक्कू, जांभूळ या फळबागा, भाजीपाला आणि कांदा, टोमॅटो यासारख्या फळभाज्यांना बसला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचा स्थायी आदेश असल्याने लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे शुक्रवारी (ता.१४) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात पावसापेक्षा जोराच्या वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.

वीज कोसळल्यामुळे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पाटील वस्तीवरील दुभती गाय मृत्यूमुखी पडली आहे. ऊस भुईसपाट झाला आहे. भाजीपाला पिकांमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका.चवळी आदी पालेभाज्या, हिरवी मिरची, वांगे, कारले, दोडका, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि काकडी आदी फळभाज्यांना नुकसानीचा फटका बसला आहे.

Pune Market Yard : फळभाज्या शंभरी पार; पावसामुळे मोठे नुकसान
Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

एप्रिल हा उन्हाळी महिना समजला जातो. या महिन्यात गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची नुकतीच काढणी झालेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ही पिके निघताच, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतीच्या पूर्वमशागतीची कामे सुरु केली जातात.

त्यानुसार शेतकऱ्यांनी ही पूर्वमशागतीची कामे सुरु केली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून सुरु झालेल्या वादळी पावसामुळे ही कामे थांबवावी लागली आहेत. या वृत्ताला कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. परंतु पंचनामे पूर्ण होऊन पिकांच्या नुकसानीचे अंतिम आकडेवारी उपलब्ध होईपर्यंत याबाबत अधिकृत सांगता येणार नसल्याचे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

यंदा जुन्नरी केशर आंब्याची आवक घटणार

राज्यातील केसरी आंब्याचा मोसम संपत आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील केशर आंबा बाजारात येत असतो. हा केशर आंबा दरवर्षी साधारणतः जून महिन्यात बाजारात येत असतो. त्यामुळे या आंब्याला जुन्नर आणि जून महिन्याच्या नावावरून जुन्नरी केशर आंबा म्हणून ओळखले जाते.

हा जुन्नर केशर आंब्याला नुकताच दुसरा बहार आलेला आहे. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळाने हा दुसरा बहारही गळून पडला आहे. त्यामुळे यंदा जुन्नरी केशर आंब्याची आवक घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.