पुणेः मावळमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना दोन मुलांनी आरडाओरड केल्याने दोन्ही मुलांना नदीपात्रात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना कोर्टाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला अन् तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे. मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही संतापजनक घटना 9 जुलैला घडली.
6 जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करण्यात आला. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला.
त्यानंतर मृत महिलेचे दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने त्या दोघांनी निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना आरोपींनी त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले.
दरम्यानच्या काळात मृत महिलेसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मृत महिलेला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती.
शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. ''नराधम आरोपीला फासावर लटकवा, दोन निष्पाप जीवांचा काय दोष होता..? आमच्या मुलीला फूस लावून तिच्या जीवाशी खेळणाऱ्या सर्व आरोपींना कडक शासन करा.'' अशी मागमी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.