Pune : पुणे जिल्हातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न; केंद्र शासनाच्या गाय गोठ्याच्या उभारणीसाठी अनुदान

अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या सूचनेनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Pune
PuneSakal
Updated on

कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कात्रज डेअरीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या गाय गोठ्याच्या उभारणीसाठी अनुदान योजनेची माहिती व बँकेच्या सुविधाबद्दल चर्चा करण्यात आली.

संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या सूचनेनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास पुणे जिल्हातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Pune
Mumbai Crime News : बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरला भावांनी संपवलं; डोक्यात हातोडा घातला अन्...

सदर मेळाव्यास कृषि विभागाचे पी. टी. काळे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजनेअंतर्गत ४५ प्रकारचे उद्योग वैयक्तिक पातळीवर उभा करता येतात. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के अनुदान दिले जाते. त्यामध्ये वैयक्तिक पातळीवर उद्योग उभा केल्यास अनुदानाची किंमत १० लाख रुपयांपर्यंत आहे.

तेच उद्योग महिला बचत गटातून शेतकरी गटातून विविध सहकारी संस्थेतून उद्योग उभा केल्यास अनुदानाची रक्कम ३ कोटीपर्यंत असून त्यातून उत्पादित झालेल्या उत्पादनाचे मार्केटिंग व ब्रँडिगसाठी लागणाऱ्या एकुण खर्चाच्या ५० टक्के रक्कम शासनाकडून अनुदानात मिळते अशी माहिती दिली.

Pune
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखणं भोवलं; ठाकरे गटाच्या 27 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, संचालक गोपाळराव म्हस्के, कालिदास गोपाळघरे, वैशालीताई गोपाळघरे यांच्यासह कुमार मारणे, अर्चना नरुटे, माधव कोकाटे तसेच पुणे जिल्ह्याच्या विविध दूध संघाचे, संस्थांचे, अध्यक्ष व बँकाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुमार मारणे यांनी केले. आभार कालिदास गोपाळघरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.